आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या छोट्या प्राण्याने केली शार्कची शिकार, फोटोग्राफरने क्लिक केले PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शार्कला जबड्यात दाबून सी लायन्सने मारले. - Divya Marathi
शार्कला जबड्यात दाबून सी लायन्सने मारले.
कोडियाक- शार्क मासा मोठ-मोठ्या प्राण्यांचा काही सेकंदात जीव घेतो. परंतु प्रत्येकवेळी असेच होईल असे नाहीये. अनेकदा शार्कसुध्दा एखाद्या प्राण्याचा शिकार होऊ शकतो. अशीच एक घटना अमेरिकेतील अलास्कामध्ये समोर आली आहे. सी लायनच्या ग्रुपने एका शार्कलाची आपले शिकार बनवले.
एका युवा फोटोग्राफरने क्लिक केले फोटो...
तीन सी लायन्स एकमेकांसोबत खेळत होते. तेव्हा त्यांच्यात एक सालमोन शार्क पोहोचला. त्यावेळी सी लायन्सने त्याच्यावर अटॅक करून त्याला शिकार बनवले. या घटनेचे फोटो युवा फोटोग्राफर फ्रेड ओ हर्नने क्लिक केले आहेत. फ्रेडने सांगितले, की मी पाहिले, की माझ्या घराजवळ सी लायन्स खेळत होते. तेव्हा मी त्यांचे फोटो काढण्यासाठी गेलो. तेवढ्यात त्यांच्यात एक शार्क आला आणि सी लायन्सने त्याच्या हल्ला केला. सी लायन्सने क्रूरतेने त्याला मारून टाकले.
फ्रेडच्या सांगण्यानुसार, सी लायन्सने शार्कला जबड्यात पकडले आणि नंतर खाऊन टाकले. ही घटना खरंच अद्भूत होती. मी गेल्या 3 वर्षांपासून फोटोग्राफी करतोय. परंतु अशी घटना पहिल्यांदाच कॅमे-यात कैद केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सी लायन्स कशाप्रकारे केली शार्कची शिकार...