आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Life Of Bushmen Of Africa Between Tradition & Modernity

दारू, ड्रग्स आणि टीन प्रेग्नेसी आहे या आदिवासींच्या आयुष्याचे कटू सत्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बुशमॅन आता असे आधुनिक कपडे परिधान करताय)
दक्षिण आफ्रिकेच्या कलाहारी वाळवंटात बुश नावाचा एक सामुदाय राहतो. बुशमॅन यांना सॅन पीपुलसुध्दा म्हटले जाते. आफ्रिकेत या समुदायाचे अस्तित्व 20 हजार वर्षांपेक्षा जास्त जूने आहे. सरकारने या लोकांना मॉडर्न आयुष्य जगण्यासाठी ढकलण्यात आले मात्र हे लोकांमध्ये ड्रग्स, दारू, अल्पवयात गर्भवती होण्याचे प्रमाण वाढले. फोटोग्राफर डेनिअल कथबर्टने वाळवंटात 17 तास प्रवास करून बुशमॅनचे आयुष्य कॅमे-यात कैद केले आहे. कालाहारीचे बुशमॅन असा ठिकाणी राहतात, जिथे पोहोचण्यासाठी रस्तादेखील नाहीये.
सरकारने बुशमॅनला आधुनिकतेकडे घेऊन जाण्यासाठी कॅम्पोमध्ये ठेवण्यास सुरुवात केली. सरकारने यांना मॉर्डन आयुष्य जगण्यासाठी मजबूर केले. त्यामुळे आता त्यांचे ट्रॅडिशनल आयुष्य संपुष्टात आले आहे. बुशमॅनने आता आधुनिकता स्वीकारली आहे. परंतु त्यामुळे त्यांच्या समाजात दारू- ड्रग्स, अल्पवयात गर्भवती होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्याकडे रोजगारसुध्दा नाहीये. कधीकाळी आत्मनिर्भर असलेला हा सामुदाय आता मुठभर धान्यासाठी तरसतात.
बुशमॅनची सामाजिक स्थित खूप वाईट आहे. त्यांना इतर दक्षिण आफ्रिकनपासून वेगळे ठेवले जाते. त्यांना कायदेशीर नागरिकत्वापासूनसुध्दा वंचित ठेवण्यात आले आहे. बुशमॅनच्या या दु:खद स्थितीला फोटोग्राफरने समोर ठेवले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कालाहारी बुशमॅनच्या ट्रॅडिशनल आणि मॉडर्न लाइफस्टाइलचे फोटो...