आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आहे सिद्धूचे घर, गार्डनमध्‍ये 600वर्षे जुनी झाडे; जिमपासून ते स्‍पापर्यंत सर्व सोयीसुविधा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरातील गार्डन परिसरामध्‍ये योगा करतना योगा करताना सिद्धू यांची पत्‍नी. इन्‍सेटमध्‍ये घरामध्‍ये सिद्धू आणि त्‍यांची पत्‍नी. - Divya Marathi
घरातील गार्डन परिसरामध्‍ये योगा करतना योगा करताना सिद्धू यांची पत्‍नी. इन्‍सेटमध्‍ये घरामध्‍ये सिद्धू आणि त्‍यांची पत्‍नी.
अमृतसर- क्रिकेट ते राजकारण असा प्रवास राहिलेल्‍या नवज्‍योत सिंह सिद्धूचा 20 ऑक्‍टोबररोजी वाढदिवस आहे. यानिमित्‍त आम्‍ही तुम्‍हाला सिद्धूच्‍या अलिशान घराविषयी माहिती देणार आहोत. अमृतसरमधील या घराची संपूर्ण पंजाबमध्‍ये चर्चा आहे. या घराला 600वर्षे जुन्‍या वृक्षांनी सजवले आहे. 
 
अलिशान आहे घर
- 49 हजार 500 स्‍केअर फुट परिसरात बनलेल्‍या या घरामध्‍ये स्विमिंगपूलपासून ते स्‍पापर्यंत सर्व सुविधा आहेत. 
- यातील गार्डनच्‍या चोहोबाजुंकडून 600वर्षे जुने झाडे लावली आहेत. 
- ऑलिव्‍ह प्रजातीच्‍या या झाडांची उंची 8 ते 12 फुट आहे. याशिवाय बोगन विलियाचे 10 झाडे आहेत. जे जवळपास 100 ते 150 वर्षे जुने आहेत. 

सिंगापूरहून मागवले शिवलिंग 
- 2014मध्‍ये सिद्धूने गृहप्रवेश कला तेव्‍हा तेथे शिवलिंगाची स्‍थापना करण्‍यात आली. 
- या‍ शिवलिंगला सिंगापूरहून मागवण्‍यात आले आहे. याची किंमत जवळपास अडीच कोटी रुपये आहे. 
- याशिवाय घरातील परिसरात गायत्री मातेचे मंदिर, भगवान गणेश आणि देवांच्‍या मुर्तीही बसवण्‍यात आले आहेत. 
- सिद्धूने आपल्‍या पत्‍नीसोबत गृहप्रवेश केला तेव्‍हा या अलिशान घराची संपूर्ण पंजाबमध्‍ये चर्चा होती. 
 
गृहप्रवेशनंतर एका वर्षांनी राहायला आले कुटुंब 
- सिद्धू यांनी मे, 2014 विविध राज्‍यांतून पंडीत बोलावून गृहप्रवेशाचा विधी तर केला मात्र आपल्‍या संपूर्ण कुटुंबासह ते एका वर्षानंतर तेथे राहायला आले. 
- जुलै 2015मध्‍ये त्‍यांची संपूर्ण फॅमिली तेथे शिफ्ट झाली. 
- या घराला बनवण्‍यासाठी 3 वर्षांचा कालावधी लागला. 
- असे म्‍हटले जाते की, याला बनवण्‍यासाठी सिद्धू यांना जवळपास 25 कोटी रुपयांचा खर्च आला. 

पुढील स्‍लाइडवर पाहा फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...