(दगडांना बॅलन्स करून बनवण्यात आलेली कलाकृती)
मायकल ग्रेब हे एक असे कलाकार आहेत, ज्यांच्या कलेमुळे त्यांना जादूगरही म्हटले जाते. जादूगर यासाठी की, ते कोणत्याही दगडाला काही अशाप्रकारे बॅलन्स करतात की पाहाणारा हैराणच होऊन जातो. ते या दगडांना बॅलन्स करत त्यांना विविध कलाकृती बनवतात. पाहाणार्याला ही कलाकृतीपाहून आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण कोणतेही रसायन, अथवा अवजार न वापरता ते दगडांना एकमेकांवर अशा खुबीने ठेवतात की, ते दगड आरामशीर एकमेकांवर उभे राहातात. ग्रेब यांच्या या कलाकृती पाहाण्यासही खुपच सुंदर असतात. या कलाकृती पाहून एखादे नवीन फिजिक्स लॉ निर्माण झाल्यासारखे वाटते. पुढील स्लाईडमध्ये तुम्ही ग्रेब यांच्या या अद्वितीय कलाकृती पाहाणार आहात. या कलाकृती वेगवेगळ्या आकाराच्या दगडांपासून निर्माण करण्यात आल्या आहेत. या कलाकृती पाहून तुम्हाला नक्की आश्चर्य होईलच.
ग्रेब यांनी दगडांना बॅलेंस करण्याची ही कला अनेक वर्षांच्या सरावातून शिकली आहे. ग्रेब म्हणतात दगडांना बॅलन्स करण्यासाठी मी अनेक वर्षे सराव केला. माझ्या आतमध्ये ही जिज्ञासा होती की, मी मनाला एकाग्र करून एक अद्भूत कलाकृतीची निर्मिती करेल.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, ग्रेब यांच्या इतर कलाकृती...