आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आला 'भयंकर परी' चा आणखी एक बोल्ड लूक, केला आहे सुसाइडचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅक्ट्रेस शमा सिकंदर. - Divya Marathi
अॅक्ट्रेस शमा सिकंदर.
शॉर्ट मुव्ही 'सेक्सोहॉलिक' द्वारे चर्चेत आलेली अॅक्ट्रेस शमा सिकंदरने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेयर केले आहेत. त्यापैकी एका फोटोला, तिने कॅप्शन दिले आहे, 'Rule your mind or it will rule you!! #thought #ruletheworld this beautiful click by @areesz. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओदेखिल अपलोड केला आहे. त्यात ती डिफरंट आऊटफिट्समध्ये कॅटवॉक करत असल्याचे दिसत आहे. शमा नेहमी तिचे बोल्ड फोटोज इन्स्टाग्रामवर शेयर करत असते. 'बालवीर' या टिव्ही शोमध्ये तिने 'भयंकर परी'ची भूमिका केली होती. त्या भूमिकेने ती चांगलीच प्रसिद्ध झाली होती. 

केला आहे सुसाईडचा प्रयत्न 
सुमारे 5 वर्षांपूर्वी शमा बायपोलर डिसऑर्डर (एका प्रकारचा मानसिक आजार) ने ग्रस्त होती. शमाच्या मते या आजाराने त्रस्त होत तिने एकचा सुसाईडचा प्रयत्नदेखिल केला होता. एका लिडींग डेलीच्या रिपोर्टनुसार एका रात्री तिने सुसाइडचा प्रयत्नही केला होता. आईला किस करत गुडनाईट म्हटले आणि सकाळी मला उठवू नकोस असे शमाने तिच्या आईला सांगितले. त्यानंतर शमाने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. पण झोपण्यापूर्वी तिने भावाला तिचे बँक डिटेल्स सांगितले होते. त्यामुळे तो परेशान जाला. भावाने लगेचच आईला कॉल केला आणि जाऊन पाहण्यास सांगितले. मात्र आता शमा या आजारातून पूर्णपणे सावरली आहे. फिट राहण्यासाठी ती रेग्युलर एक्सरसाइज करते. 

शमाने करियरची सुरुवात मॉडेलिंगद्वारे केली होती. त्यानंतर ती अनेक म्युझिक व्हिडीओमध्येही झळकली. शमाने काही चित्रपटांतही काम केले आणि त्यानंतर छोट्या पडद्यावर एंट्री घेतली. 'ये मेरी लाइफ है' (2003), 'सेवन' (2011) आणि 'बालवीर' (2014) तिच्या काही निवडक मालिका आहेत. तिने 'प्रेम अगन' (1998), 'मन' (1999), 'अंश' (2002), 'धूम धडाका' (2008) मध्ये अभिनय केला आहे. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, शमाचे इतर 4  PHOTOS.. 
 
बातम्या आणखी आहेत...