समुद्राखालील छायाचित्रांची (अंडरवॉटर फोटो) एक मालिका नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. प्रशांत महासागरात एकाच जागेवर 40 हून अधिक जहाजे आणि जवळपास 250 लढाऊ विमाने समुद्रात बुडालेली आहेत.
ही सर्व लढाऊ विमाने जपानी हवाई दलाची आहेत. ज्यांना दोस्त राष्ट्रांनी 1944 ला दुस-या महायुद्धाच्या काळात पाडले होते. मोहीम ऑपरेशन हेलस्टोनच्या दरम्यान ही विमाने पाडण्यात आली होती. या युद्धात जपानी सेनेला भयंकर नुकसान सहन करावे लागले. कारण या सामरिक सागरी क्षेत्रात त्यांनी
आपली मजबूत पकड निर्माण केली होती. दोस्तांनी न्यू गयाना आणी सोलोमन आयलंड बेटे येथे आपला तळ (बेस) बनवून त्याचा प्रभावी उपयोग ते करत होते.
ऑपरेशन हेलस्टोनच्या 71 वर्षांनंतरही समुद्रात उडी मारणा-या पाणबुड्यांची (पाणबुडे-स्कूबा डायव्हिंग) अत्यंत आवडती जागा आहे. कारण ते तिथे विमानांचा मलबा (ढीग)बघण्यासाठी समुद्रतळाशी जातात. इंग्लंडचे पाणबुडे निक ब्लेक (वय 49) यांनी सांगितले की गेल्या वर्षी 'मे'मध्ये ते तिथे गेले होते. या सहली दरम्यान त्यांनी एका दिवसात तीन आणि एकूण 30 ड्राइव्ह (उड्या) मारल्या. तिथे इतके मलबा आहे की त्याला भंगाराची राजधानी आपण म्हणू शकतो.
पुढील स्लाईडवर पाहा प्रशांत महासागरातील जहाज आणि विमानाचा खच असलेली छायाचित्रे...