(फोटो- रक्तबंबाळ बिबट्या बघितल्यावर निश्चितच पापण्या वर होतात.)
एका झाडावर रक्तबंबाळ बिबट्या दिसत आहे तर दुसऱ्या झाड्यावर झाडासह कापलेला साप. दोघांच्या शरीरातून भळाभळा रक्त वाहत आहे. जणू झाडाला आणि या प्राण्यांना एकाच वेळी करवतीने कापण्यात आले आहे. पण हे वास्तव नाही. ही एक अभिनव जाहिरात आहे. यात संदेश देण्यात आला आहे, की झाड्यांची अनिर्बंध तोड केल्याने त्याचा सर्वाधिक फटका जंगलातील प्राण्यांना बसतो.
क्रिएटिव्ह आणि आर्ट डायरेक्टर गणेश प्रसाद आचार्य यांनी कॉपी रायटर कौशिश कॅटी रॉय यांच्या मदतीने या अभिनव जाहिराती साकारल्या आहेत. झाडांना कापण्याचा दुसरा अर्थ वन्यजिवांना ठार मारणे असा आहे, असा संदेश यातून देण्यात आला आहे. भारतातील पर्यावरण पत्रिका सेंचुरी एशियासाठी या जाहिराती तयार करण्यात आल्या आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, एकापेक्षा एक सरस अभिनव जाहिराती....