आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात धोकादायक विमानतळावर युवकाला धडकले प्‍लेन, तरीही काढत होता फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात धोकादायक विमानतळावर एका व्‍यक्‍तीला चक्‍क विमान धडकून निघून गेले. ती व्‍यक्‍ती अत्‍यंत जवळून विमानाचा फोटो घेत होती. ही घटना फ्रेंचमधील सेंट बार्ट्स बेटाच्‍या विमानतळावरील आहे. जवळ उभ्‍या असलेल्‍या दुस-या व्‍यक्‍तीने या घटनेचे फोटो घेतले आहेत.
सेंट बार्ट्स बेटाच्‍या या विमानतळाचे नाव गुस्ताफ-3 एअरपोर्ट आहे. शरीराला विमानाचा स्‍पर्ष झाला असला तरी, त्‍या व्‍यक्‍तीला काही इजा झाली नाही. मात्र, अशा घटनेमध्‍ये एखाद्याचा जीवही जाऊ शकतो, असे जाणकार म्‍हणतात. घटनेनंतरही हा व्‍यक्‍ती हसत होता. त्‍याच्‍या चेह-यावर कोणतीही भीती नव्‍हती. ज्‍या विमानामुळे ही घटना घडली ते आकाराने लहान होते. स्थानिक रहिवाशी आणि व्‍हिडीओग्राफर सेबेस्टियन पोलिटानो म्‍हणाले, प्लेनचा समोरचा भाग त्‍या व्‍यक्‍तीला लागला. पोलिटानो म्‍हणाले की, या घटनेनंतरही पीडित व्‍यक्‍तीला काही वाटले नाही. तो फोटो काढतच राहिला.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, या घटनेचे आणखी काही PHOTOS....