आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार होऊ नये म्हणून गरम दगडाने केली जाते मुलींची ब्रेस्ट आयर्निंग, वाचा 8 विचित्र प्रथा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकीकडे मनुष्य प्रगतीपथावर आहे, तर दुसरीकडे मन अस्वस्थ करणा-या विचित्र परंपरा अनेक वर्षांपासून आजतागायत तशाच सुरु आहेत. या परंपरांचा विज्ञानाशी काडीमात्र संबंध नाहीये. आज आम्ही तुम्हाला अशा काही विचित्र परंपरांविषयी सांगतोय, ज्याच्या नावाखाली महिलांवर अगणिक अत्याचार केले जातात.
गरम दगडाने केले जाते ब्रेस्ट आयर्निंग...
पुरूषांच्या वाईट नजरेपासून वाचण्यासाठी काय करावे याची चिंता सगळ्याच आयांना सतावत आहे. यावर उपाय म्हणून आफ्रिका खंडातील कॅमरून या देशातील महिला त्यांच्या लेकींना छेडखानी आणि बलात्कारापासून वाचवण्यासाठी एक विचित्र पद्धत अवलंबतात. या स्त्रिया आपल्या वयात येणा-या मुलींचे ब्रेस्ट आयर्निग करून घेतात. या महिला मुलगी वयात येण्याच्या आधीच तिच्या छातीवर गरम दगडाने चटके देतात. यात या मुलींना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. असे करणे आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक असले तरी अब्रू वाचवण्यासाठी मुलींना हे चटके सहन करावे लागतात. कॅमरून देशातील एक महिलेने वृत्तसंस्थांना दिलेल्या माहितीनुसार, दर शुक्रवारी एक महिला काही मुलींना तिच्या घरी बोलवते. त्यांना किशोरवयातील काही धोक्यासंबंधी माहिती देते, तसेच यावेळी ती ब्रेस्ट आयर्निंगविषयी चर्चा करते. या महिलेने सांगितले, की ती स्वतः सोळा वर्षांची असतांना तिच्या आईनेदेखील तिच्या ब्रेस्टवर गरम दगड ठेवला होता. तरी तिच्या मनात तिच्या आईविषयी वाईट भावना आली नाही.
किशोरवयात मुलींच्या स्तनाची वाढ होत असताना तिची आई छातीवर गरम दगड ठेवते ज्यामुळे स्तनाची वाढ कमी होते आणि मुलीचे सौंदर्य कमी होते. आपल्या मुलींना छेडखानीला आणि बलात्कारासारख्या घटनांपासून वाचवण्यासाठी या महिला असे करतात. कॅमरूनच्या महिलांच्या मते असे केल्याने मुलींचे सौंदर्य कमी होते.

कॅन्सर होण्याची शक्यता
12 ते 15 वर्षांच्या मुलींची छाती सपाट करण्यासाठी गरम लोखंडाचा किंवा दगडाचा वापर केला जातो. ही पध्दत त्यांच्यासाठी धोक्याची ठरू शकते. यामुळे कॅन्सर, फोड येणे, खाज येणे, अल्सर, स्तनामध्ये संसर्गासारखे गंभीर आजार होण्याची दाट शक्यता असते.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, अंगावर शहारे आणणा-या अशाच काही क्रूर परंपरा...