आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shooters Grill Is A Gun Themed Restaurant In Colorado

अनोखे रेस्तरॉ, येथे बंदुकीच्या टोकावर खाद्यपदार्थ करतात सर्व्ह, पाहा PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - शूटर ग्रिल रेस्तरॉ - Divya Marathi
फोटो - शूटर ग्रिल रेस्तरॉ
बंदुकीच्या टोकावर अगदी काहीही करण्यास लोक तयार होत असतात. कारण त्यामागे प्रचंड भीती दडलेली असते. त्या भीतीमध्ये वावरणे कोणालाही आवडत नाही. पण अमेरिकेत बंदुकींच्या जगात वावर करणे ही जणू संस्कृतीच बनली आहे. येथे बंदूक म्हणजे सोबतीच बनला आहे. त्यामुळेच अमेरिकेच्या कोलोराडोमध्ये बंदुकीच्या थीमवर एक रेस्तरॉ सुरू करण्यात आले आहे. या अनोख्या रेस्तरॉलाही लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

कोलोराडोमध्ये असलेल्या 'शूटर ग्रिल' नावाच्या या रेस्तरॉमध्ये चारही बाजुला बंदुकी लटकवलेल्या दिसतात. तसेच सर्व्ह करणार्‍यांकडे आणि पदार्थ तयार करणार्‍यांकडेही बंदूक आढळतात. हत्यारे बाळगणारे आणि सोबत घेऊन फिरणार्‍यांना येथे प्रोत्साहन दिले जाते. या रेस्तरॉच्या दारावर तशी वेलकम नोटही आहे.
डिशेसची अनोखी नावे
बंदुकीच्या थीमवर तयार करण्यात आलेल्या या रेस्तरॉमध्ये असणार्‍या डिशेसची नावेही अनोखी आहेत. त्यात 'एम-16 बुरिट्टो' तसेच 'लॉक्ड अँड लोडेड नाचोज'यांचा समावेश आहे. रेस्तरॉचे मालक लॉरेन बोएबर्ट आणि त्यांचे पती आहेत. त्यांच्या मते कोलोराडो येथे बंदूक घेऊन वावरण्यास परवानगी अाहे. त्यामुळेच अशा प्रकारची थीम निवडली. लोकांनाही ही थीम भावते आहे. त्यामुळे आगामी काळात कोलोराडोबाहेरही अशा थीमचे रेस्तरॉ सुरू करण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले.

पुढील स्लाइड्वर पाहा, या अनोख्या रेस्तरॉचे काही आणखी PHOTO