आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solar Panels Look Like Tree Leaves Inspired By Nature

लहान पानांच्या आकाराचे नवे सोलार पॅनल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाढती ऊर्जेची गरज लक्षात घेता, दररोज नवनवीन प्रयोग केले जात आहेत. यात सोलार पॅनल एक महत्त्वाचा आणि सर्वाधिक फायदेशीर पर्याय आहे. भारत, अमेरिकेसारख्या अनेक देशांत सोलार पॅनलचा वापर वाढला आहे आणि आता लोक स्वत:च्या घरावरही त्याचा वापर करू लागले आहेत; पण अनेक ठिकाणी जागेच्या अभावामुळे सोलार पॅनल लावता येत नाही.
ब्रुकलिन एसएमआयटी डिझाइन समूहाने या समस्येवरही तोडगा काढला आहे. या समूहाने लहान लहान पानांच्या आकाराचे सोलार पॅनल तयार केले आहेत. ते कुठेही सहज घेऊन जाता येतात. तसेच त्यांची फिटिंग करणेही सोपे आहे. एवढेच नाही, तर घराच्या बाहेरील भिंतीवरही डिझाइन म्हणून ते लावता येतात. विशेषत: 100 टक्के पुनर्निर्माण करता येणार्‍या प्लास्टिकपासून हे पॅनल तयार करण्यात आले आहे.