(फोटो- सोलो वेडिंगमधील नवरी.)
गेल्या काही वर्षांमध्ये जपानमध्ये सोलो वेडिंग वाढले आहेत. कौटुंबिक आयुष्याला नाकारुन करिअरला जास्त प्राथमिकता दिली जात असल्याने तरुणी सोलो वेडिंगला पसंत करीत आहेत. यामुळे भारतातील वधू-वर सुचक मंडळांप्रमाणेच सोलो मॅरेज मंडळ जपानमध्ये वाढत आहेत. यासाठी भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्याची प्रथाही पडली आहे.
करिअरला प्राथमिकता देणाऱ्या या तरुणींना कौटुंबिक आयुष्य नको असले तरी एखाद्या नवरीप्रमाणे सजायचे असते. लग्नासारखा कार्यक्रम आयोजित करायचा असतो. यात पारंपरिक पद्धतीने लग्न होत नसले तरी पाहुणे उपस्थित असतात. मंचावर असलेल्या सोलो नवरीला भेटून शुभेच्छा देतात. पार्टी एन्जॉय करतात. असा हा कार्यक्रम केवळ एका दिवसाचा असतो. दुसऱ्या दिवसी ही युवती जॉबवर निघून जाते.
या कार्यक्रमाचे आयोजन इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या करतात. यामुळे या कार्यक्रमाला लग्नासारखा लुक येतो. फोटो शुटसाठी उत्सूक असलेल्या नवरीचे अनेक फोटो काढले जातात.
पुढील स्लाईडवर बघा, सोलो मॅरेजची काही छायाचित्रे....