आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या रेड लाइट एरियात सेक्स वर्कर्स घेत आहेत 1000-500च्या नोटा, कमावले लाखो रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता/नई दिल्ली. 500 आणि एक हजार नोटांवर बंदी आल्यापासून लोक अडचणीत आले आहेत. मात्र याचा परिणाम देशातील सर्वात मोठा रेड लाइट एरिया म्हणून ओळखल्या जाणा-या सोनागाछीवर पडलेला दिसून येत नाहीये. सोनागाछीच्या सेक्स वर्कर्स आजही त्यांच्या ग्राहकांकडून 500 आणि 1000 च्या नोटा घेत आहेत. याच कारणामुळे केवळ 48 तासांच्या आता सेक्स वर्कर्सनी तब्बल 55 लाखांची कमाई केली आहे. जुन्या नोटा स्वीकारणे नाइलाज, महिन्याच्या अखेरपर्यंत घेणार 500- हजारचे नोट...

- पीटीआयच्या रिपोर्टनुसार, नोटांवर बंदी येण्यापूर्वीपर्यंत सेक्स वर्कर्सना 300 ते 400 रुपये मिळायचे. मात्र या नोटांवर बंदी आल्यापासून सेक्स वर्कर्स लोकांकडून 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा घेत आहेत.
- सेक्स वर्कर्ससाठी काम करणारी एनजीओ दरबार महिला समन्वय कमेटीच्या भारती डे यांनी सांगितले, की या महिन्याच्या अखेरपर्यंत या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत.
- सेक्स वर्कर्सच्या मते, जर त्यांनी 500 आणि 1000 रुपयांचा नोट स्वीकारणे बंद केले, तर ग्राहक पळून जातील. त्यामुळे या नोट घेणे हा त्यांच्यासाठी नाइलाज झाला आहे.
को-ऑपरेटिव्ह बँक करत आहे मदत
- भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्स वर्कर्ससाठी असलेली उषा को-ऑपरेटिव्ह बँक या महिन्याच्या अखेरपर्यंत जुन्या नोटा स्वीकारणार आहे.
- उषा को-ऑपरेटिव्ह बँकेत 120 सेक्स वर्कर्सनी पैसे जमा केले आहेत. तर दुस-या दिवशी 200 सेक्स वर्कस पैसे जमा करण्यासाठी पोहोचल्या होत्या.
- केवळ दोन दिवसांत 55 लाख रुपये बँकेत जमा झाले आहेत.

अनेक सेक्स वर्कर्सकडे नाहीये बँक अकाउंट
- भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक सेक्स वर्कर्सकडे बँकेत खाते नाहीये.
- उषा बँकेत केवळ 30 हजार सेक्स वर्कर्सचे खाते आहे. तर रजिस्टर्ड सेक्स वर्कर्सची संख्या 1.3 लाख आहे.
- भारती यांच्या मते, ज्यांच्याकडे बँकेत खाते नाहीये, त्यांच्यासाठीसुद्धा मार्ग शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

पुढील स्लाईड्समध्ये बघा संबंधित Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...