आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा1999 मध्ये फिका व सर्गियो हे भाऊ दक्षिण आफ्रिकेतील 56 मैलांच्या कॉमरेड्स रेसमध्ये सहभागी झाले. ते जुळे नव्हते, पण सारखेच दिसत. फिकाने धावायला सुरुवात केली तेव्हा सर्गियो अनेक मैलांवरच्या एका पोर्टेबल टॉयलेटमध्ये लपून बसला. सर्गियोने धावायला सुरुवात केली तेव्हा फिकाने विश्रांती घेतली, तरीही ते नवव्या स्थानावर राहिले.
कसे पकडले गेले? प्लॅनिंग चांगले होते. त्यांनी एकमेकांची जागा बदलली तेव्हा बूट आणि मायक्रोचिपही बदलली. पूर्ण स्पर्धेदरम्यान ट्रॅकवर असल्याचा रेकॉर्ड चिपमध्ये होता. दोघांचे घड्याळ सारखे होते. पण एक डावखुरा होता. स्पर्धेचे फोटो एका वर्तमानपत्रात छापून आले तेव्हा एका वाचकाने पाहिले की, स्पर्धेदरम्यान घड्याळ कधी उजव्या हातात होते तर कधी डाव्या हातात. चौकशी केली असता त्यांनी फसवणूक केल्याचे मान्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.