केपटाऊन- दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरियामधील वाईल्डलाईफ फोटोग्राफर व्हिम हिवर याने वन्यप्राण्यांचे अप्रतिम फोटो क्लिक केले आहेत. यातील काही फोटो प्राण्यांनी शिकार करतानाचे आहेत. या महत्त्वाच्या प्रसंगी त्यांच्या भावना हिवरने कॅमेऱ्यात टिपल्या आहेत. 43 वर्षीय हिवरने जपान, बोत्सवाना आणि स्वलबर्डसह अनेक ठिकाणी हे फोटो क्लिक केले आहेत.
व्हिम हिवर अनेक वर्षांपासून फोटोग्राफी करतात. जगातील सर्वच देशांमध्ये फोटोग्राफी केली असल्याचे हिवर सांगतात. सिंहिंण, वाघिण, हत्तीण, डॉल्फिन, घुबड यांच्यासह अनेक वन्यप्राण्यांच्या प्रसुती, शिकार आणि नॅचरल पोज कॅमेऱ्यात टिपल्या आहेत. फोटोग्राफी एक छंद नसून आयुष्याचा भाग बनला आहे, असे हिवर सांगतात. बहुधा ते जंगलातच राहणे पसंत करतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, व्हिम हिवर यांनी वन्यप्राण्यांचे काढलेले अप्रतिम फोटो....