आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spectacular, Rarely Seen Images Of China's Railways

चीनच्या रेल्वेचे न पाहिलेले PHOTOS, क्लिक करण्यासाठी गाठला 3 लाख KMचा प्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनच्या चँगबाई माऊंटेनजवळ क्लिक करण्यात आलेला रेल्वेचा फोटो - Divya Marathi
चीनच्या चँगबाई माऊंटेनजवळ क्लिक करण्यात आलेला रेल्वेचा फोटो
बिजींग- चीनी फोटोग्राफरने मागील वर्षांत जवळपास 3 लाख किलोमीटरचा प्रवास गाठून चीनच्या रेल्वेचे फोटो क्लिक केले आहेत. 25 वर्षांच्या वेंगला चीनी रेल्वेचा चाहता असल्याचे मानले जाते. सीएनएनने वेंगचा हा फोटो पब्लिश करून लिहिले, की चीनी रेल्वेचे असे फोटो जगात खूप कमी पाहायला मिळतात.
1.2 लाख किलोमीटर लांब आहे चीनी रेल्वे नेटवर्क...
चीनची रेल्वे लाइन जवळपास 1.2 लाख किलोमीटर लांब आहे. ही अमेरिकेनंतर दुसरी सर्वात मोठी रेल्वे लाइन आहे. प्रती किलोमीटरचा प्रवास करणा-या लोकांची संख्या चीनमध्ये सर्वाधिक आहे. देशाच्या रेल्वे लाइनची सुंदर आणि विविधता दाखवण्यासाठी वेंगने अनेक महिने घरापासून दूर राहून रेल्वेचा प्रवास केला.
फोटोग्राफर बनला सेलिब्रिटी-
सीएनएननुसार, वेंग आपल्या या कारनाम्यामुळे एक सलिब्रिटी बनला आहे. चीनी आणि इंटरनॅशनल मीडियामध्ये त्याच्या दोन डझनपेक्षा जास्त मुलाखती छापल्या आहेत. चीनी टेलिव्हिजनने वेंगवर डॉक्युमेंट्रीसुध्दा प्रसारित करण्यात आली होती. याचवर्षी त्याचे दोन पुस्तकेसुध्दा येणार आहेत. आपल्या फोटोबुकमध्ये त्याने छायाचित्रांशिवाय फोटोग्राफी टेक्निकविषयीसुध्दा सांगितले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा चीनी रेल्वेचे 14 PHOTOS...