आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुऱ्हाड-आरीने कापून नेले या जीवाचे मांस, पर्यटकांनी घेतले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(व्हेलचे मांस कापून नेताना नागरिक.)
कॅलिफोर्नियात एक विशाल व्हेल मासा समुद्रकिनाऱ्यावर वाहून आला. या व्हेलसमोर फोटो काढण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली. या मास्याची लांबी 50 फुट आहे. दुरुन बघितले तर व्हेल अगदी एखाद्या छोट्या खडकासारखी दिसते. या व्हेलच्या डोक्यातून रक्त बाहेर पडत होते. जरा वेळाने या माश्याचा मृत्यू झाला. या माश्याचा मृत्यू कशाने झाला याची माहिती शास्त्रज्ञ मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
या दरम्यान कॅलिफोर्निया अॅकॅडमी ऑफ सायंसचे अनेक लोक येथे आले. त्यांनी अगदी कुऱ्हाड-आरीने व्हेलचे मांस कापून नेले. मांसाचे तुकडे एवढे अवजड होते, की त्यांना दोरीच्या मदतीने न्यावे लागले. यासंदर्भात मरिन मॅमल सेंटरच्या प्रवक्त्याने सांगितले, की कॅलिफोर्नियाच्या उत्तर भागात गेल्या 40 वर्षांमध्ये 17 व्हेल मासे अशा प्रकारे समुद्रकिनाऱ्यावर सापडले. त्यांचा लगेच मृत्यू झाला.
पुढील स्लाईडवर बघा, या विशाल जिवाचे फोटो... पर्यटकांनी काढले फोटो...