आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा काचेप्रमाणे लखलखणारी ही अद्भूत कोळी, नाजूक दागिना असल्याचा होतो भास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थ्वाइटेसिया प्रजातीची कोळी
जगात विविध प्रकारच्या जीव-जंतूच्या प्रजाती आढळतात. दुर्मिळ प्रमाणात आढणा-या या प्रजाती सामान्य प्रजातींपेक्षा खूप वेगळ्या असतात. याचे उदाहरण वरील छायाचित्रातील कोळी आहे. तिच्याकडे बघून असे वाटते, तिला पूर्णत: काचेपासून किंवा एखाद्या नाजूक दागिन्याच्या तुकड्यापासून तयार करण्यात आले असावे.
मात्र तसे काही नसून, ही एक जिवंत थ्वाइटेसिया नावाची कोळी आहे. या प्रजातीमध्ये विविध कोळी आढळतात. त्यापैकी ही एक आहे. तिच्याकडे बघता असे वाटते, की तिच्या पोटावर एखाद्या चमकदार धातूने नक्षीकाम केले असावे. मात्र हा धातू नसून तिची त्वचा आहे.
या अद्भूत कोळीविषयी अद्याप जास्त माहिती मिळू शकलेली नाही. असे म्हटले जाते, की ही कोळी ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरमध्ये आढळते. या कोळीच्या छायाचित्रांना विविध फोटोग्राफर्सनी क्लिक केले आहे.
अद्भूत अशा कोळीची नक्षीदार आणि नाजूक त्वचा पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...