आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spit Fighter Create To Am's For Soldiers Egg Box's

अंड्यांच्या डब्यांपासून बनवला स्पिट फायटर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमधील 27 वर्षीय आर्किटेक्ट जॉक मुनरो आणि 27 वर्षीय आर्टिस्ट शेरलॉट अँस्टन यांनी दुसर्‍या महायुद्धात वापरण्यात आलेल्या ब्रिटनच्या ऐतिहासिक ‘बॅट्स ऑफ ब्रिटन’ या स्पिट फायटरची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे. 36 फूट लांबीच्या या विमानाचे वैशिष्ट्य असे की, ते ‘एम्स फॉर सोल्जर’ नावाच्या अंड्यांच्या डब्यांपासून तयार करण्यात आले आहे. ही अंडी ब्रिटनमध्ये धर्मदायार्थ विकण्यात येतात आणि त्या पैशातून सैनिकांना अर्थसाहाय्य करण्यात येते. हे विमान डक्सफोर्ड येथील इम्पिरियल वॉर म्युझियममध्ये ठेवण्यात आले आहे. मूळ विमानासारखा आकार देण्यासाठी खूपच परिश्रम घ्यावे लागले, असे मुनरोचे म्हणणे आहे.

650 अंड्यांच्या डब्यांचा उपयोग करण्यात आला आहे या फायटर जेटच्या निर्मितीसाठी.

5000 किलो वजनाच्या 450 ग्लू स्टिकच्या मदतीने या विमानाची जोडणी करण्यात आली आहे.

06 आठवडे निर्मितीसाठी लागले. दहा लिटर पेंटने जेटची रंगरंगोटी करण्यात आली आहे.