(मरीन स्कारने काढलेले छायाचित्र)
घार गतीने शिकार करण्यात माहिर आहे. परंतु अनेकदा तिलाही पराभव सहन करावा लागतो. असाच एक प्रसंग फ्लोरिडोच्या सारासोटामध्ये समोर आला. एक घार शिकारीच्या शोधात घुबडाच्या घरट्यात जाऊन पोहोचला. घरट्यातून बाहेर निघून घुबडाने खूपच भयावह पध्तीने घारीवर हल्ला केला. घुबडाने पंख पसरवले आणि टोकदार नखांनी घारीवर हल्ला केला. घार हल्ला करेल अशी घुबडाला अपेक्षा नव्हती, म्हणून तो शिकार न करताच निघून गेला.
या छायाचित्रांना फ्लोरिडाचा रहिवासी फोटोग्राफर मरीना स्कारने कैद केले आहे. मरीना म्हणते, घारीला गतीने हल्ला करताना बघितले आहे. तशाच जोशात घार घुबडाच्या घरट्याकडे निघाली होती. तेव्हा घरट्यात बसलेल्या घुबडाने त्याच्यावर हल्ला केला.
मरीना सांगते, तिच्या एका मित्राने सांगितले ती त्याच्या घरात काही घुबड घरटे बनवून राहतात. परंतु घार नेहमी त्यांना
आपले शिकार बनवण्याचा प्रयत्न करते. मी जेव्हा त्याच्या येथे फोटोग्राफी करण्यासाठी पोहोचले. तेव्हा घुबड आणि घार यांचा सामना झाला. घारीच्या हल्ल्याने घुबडाने आपले डोळे बंद केले आणि आपले टोकदार नखांनी त्याच्या पंखावर हल्ला केला. यावेळी मी त्यांच्या शिकारीची काही छायाचित्रे कैद केली आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा घार आणि घुबड यांच्यातील शिकारीची छायाचित्रे...