आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमली पदार्थांमुळे बदनाम झालेले भारतातील लिटिल ग्रीस, पर्यटक मात्र आजही करतात भरभरून प्रेम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिमालयाच्‍या दुर्गम भागातील पायथ्‍याला वसलेल्‍या मलाना या छोट्या गावाची लिटिल ग्रीस म्‍हणून जगभर ओळख आहे. इथले नैसर्गिक सौंदर्य पाहण्‍यासाठी जगभरातील पर्यटक गावाच्‍या दिशेने येत असतात. याशिवाय अमली पदार्थ मिळण्‍याचा अड्डा म्‍हणून पश्चिमी देशात या गावाला 'मलना क्रीम' या नावाने ओळखले जाते.
न्‍यूयार्क सारख्‍या शहरातील रेस्‍तरॉंमध्‍ये इथल्‍या अमली पदार्थाला सर्वात जास्‍त किमत मिळते. जगभरातील माफियांमध्‍ये मलाना गावातील चरस, गांजा प्रसिद्ध आहे.
भारतामध्‍ये चरस आणि गांजाची शेती करण्‍यावर बंदी आहे. मात्र या दुर्गम भागातील भौगोलीक परिस्‍थीताचा फायदा घेऊन अंतरराष्‍ट्रीय माफिया चरस आणि आफूची शेती करतात. इथले नैसर्गिक सौंदर्य पाहण्‍यासाठी गावात नेहमीच विदेशी पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते.
समुद्र सपाटीपासून 3000 फुट उंचीवर असलेले मलाना गावाबद्दल काही वर्षापूर्वी खूप कमी लोकांना माहिती होती. हिमालायातील बर्फ वितळल्‍यावर इथल्‍या शेतीमध्ये मोठ्या प्रकाणात अमली पदार्थाचे पीक घेतले जाते.
पुढील स्‍लाईडवर पाहा 'मलाना' गावातील नैसर्गिक सौंदर्य-