आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामीबियातील निर्मनुष्‍य गाव, निरव शांततेमुळे आहे प्रसिद्ध, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अफ्रिका खंडातील नामीबिया देशामधील 'टाऊन ऑफ सॉलिटायर' नावाचे गाव निरव शांततेमुळे प्रसिद्ध आहे. इथली भीतीदायक शांतता अनुभवल्‍यानंतर माणसाच्‍या अंगावर काटा आल्‍याशिवाय राहात नाही. नामीबियाच्‍या नामिब-नाऊक्‍लुफ्ट नॅशनल पार्कजवळ असलेल्‍या गावात भर दिवसा पाऊल टाकण्‍याचे धाडस कोणताही सुज्ञ माणूस करणार नाही.
सोस्‍सुवलेई आणि वाल्विश खाडीच्‍या मधोमध असलेल्‍या या गावात फक्त एक 'हँड ऑपरेटेड पेट्रोल पंप', एक पोस्‍ट ऑफीस, एक बेकरी आणि धाडसी पर्यटकांसाठी एका कॅम्‍प या शिवाय दुसरे काही पाहायला मिळणार नाही. वाळवंटाचा पडीक भाग सोडला तर दूरपर्यंत एकही गाव दिसत नाही. या गावात निर्जनस्‍थळी उभ्‍या असलेल्‍या आणि बंद पडलेल्‍या काही गाड्या आहेत. याशिवाय चिटपाखरूही फिरकत नाही.
काय आहे या गावाची कथा-
या निर्जन गावाची कथा मात्र मनोरंजक आहे. 1938 मध्‍ये विलयिम क्रिस्‍टोफल वान कॉलर नावाच्‍या एका व्‍यक्तिने मेंढीपालन करण्‍यासाठी ना‍मीबियाच्‍या सरकारकडून ही जमीन विकत घेतली. आज जी दोन-तिन घरे याठिकाणी दिसतात ती क्रिस्‍टोफलने बांधलेली आहेत. क्रिस्‍टोफलच्‍या पत्‍नीने या जागेला 'सॉलिटायर' नाव दिले आहे. आज मात्र या ठिकाणी भितिदायक शांततेशिवाय काहीच पाहायला मिळत नाही.
पुढील स्‍लाईडवर पाहा, भितिदायक सॉलिटायरचे आणखी काही फोटो...