Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Story Of Buddhist Amrapali Monk

इतिहासातील या स्त्रीच्या सौंदर्यावर मोहित होती संपूर्ण प्रजा, झाले होते युद्ध

दिव्‍य मराठी वेब टिम | Update - Oct 24, 2017, 06:27 AM IST

ही कथा आहे भारतीय इतिहासातील सर्वात सुंदर महिलेच्या नावाने विख्यात असलेल्या 'आम्रपाली'ची, जिला आपल्या सौंदर्याची किंमत व

 • Story Of Buddhist Amrapali Monk
  ही कथा आहे भारतीय इतिहासातील सर्वात सुंदर महिलेच्या नावाने विख्यात असलेल्या 'आम्रपाली'ची, जिला आपल्या सौंदर्याची किंमत वेश्या बनून चुकवावी लागली. ती कोणाचीही पत्नी होऊ शाकाकी नाही परंतु संपूर्ण नगराची नगरवधू मात्र बनली. आम्रपालीने स्वतःसाठी अशा आयुष्याची निवड केली नव्हती, उलट वैशालीमध्ये शांती आणि गणराज्याची अखंडता कायम ठेवण्यासाठी तिला एकाची पत्नी बनवून संपूर्ण नगरकडे सोपवण्यात आले. तिने अनेक वर्ष धनवान लोकांचे मनोरंजन केले परंतु जेव्हा तत्कालीन बुद्धांच्या संपर्कात आली तेव्हा सर्व गोष्टींचा त्याग करून तिने बौद्ध भिक्षुणीची दीक्षा घेतली.
  राजा बिंबिसारने आम्रपालीसाठी केले होते युद्ध
  राजा बिंबिसार आम्रपालीवर मोहित झाले होते. राजाने आम्रपालीला प्राप्त करण्यासाठी लीच्छिवीसोबत युद्ध केले होते. आम्रपाली आणि राजा बिंबिसार यांना एक मुलगासुद्धा झाला. त्याचे नव्ह जीवक ठेवण्यात आले होते. बिंबिसारने जीवकला शिक्षणासाठी तक्षशीला येथे पाठवले होते. येथे शिक्षण घेऊन जीवक एक प्रसिद्ध चिकित्सक आणि राज वैद्य बनला.
  पुढे जाणून घ्या, आम्रपालीला हे नाव कसे मिळाले आणि संपूर्ण नगर तिच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहत होते...

 • Story Of Buddhist Amrapali Monk
  आम्रपालीला जन्म दिलेल्या आई-वडिलांचीकोणालाच माहिती नाही, परंतु ज्या लोकांनी तिचे पालनपोषण केले त्यांना ती एका आंब्याच्या झाडाखाली मिळाली होती. यामुळे तिचे नाव आम्रपाली
 • Story Of Buddhist Amrapali Monk
  आम्रपाली जसजशी मोठी होत गेली तिचे सौंदर्य आणखीनच वाढत गेले. वैशालीमधील प्रत्येक पुरुष तिला स्वतःच्या पत्नी रुपात पाहत होता. लोकांमध्ये आम्रपालीला हस्तगत करण्यासाठी एवढी चुरस निर्माण झाली होती की, कोणी कोणत्याही थराला जाण्यास तयार होता. हीच सर्वात मोठी समस्या होती. आम्रपालीच्या आई-वडिलांना या गोष्टीची जाणीव होती की, आम्रपालीचे लग्न ज्या व्यक्तीसोबत होईल तो सर्वांसाठी शत्रूप्रमाणे ठरेल आणि वैशालीमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील. या परिस्थितीमुळे ते कोणत्याही निर्णयापर्यंत पोहचू शकत नव्हते.
 • Story Of Buddhist Amrapali Monk
  या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी एके दिवशी वैशालीत सभा भरवण्यात आली. या सभेमध्ये उपस्थित सर्व पुरुष आम्रपालीशी लग्न करण्याच इच्छुक होते. यामुळे योग्य निर्णय घेणे अवघड होऊन बसले. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी वेगवेगळे विचार मांडण्यात आले परंतु कोणताही योग्य मार्ग निघू शकला नाही.
 • Story Of Buddhist Amrapali Monk
  परंतु शेवटी जो निर्णय घेण्यात आला, त्यामुळे आम्रपालीचे आयुष्य नरकात लोटले गेले. सर्वांच्या संमतीने आम्रपालीला नगरवधू म्हणजे वेश्या घोषित करण्यात आले. असे यामुळे करण्यात आले कारण, सर्वांना वैशालीचे गणतंत्र सुरक्षित ठेवण्याची इच्छा होती. आम्रपालीला एका व्यक्तीला सोपवले असते तर यामुळे एकता खंडित झाली असती. नगरवधू झाल्यानंतर प्रत्येकजण तिला मिळवण्यासाठी स्वतंत्र होता. अशाप्रकारे राज्याच्या निर्णयाने तिला वेश्या बनवले.
 • Story Of Buddhist Amrapali Monk
  भगवान बुद्ध एकदा प्रवास करत-करत वैशालीत आले. त्यांच्यासोबत शेकडो शिष्य होते. सर्व शिष्य दररोज वैशालीमध्ये जाऊन भिक्षा मागत होते.

  वैशालीमध्ये आम्रपालीचा महाल होता. ती वैशालीची सर्वात सुंदर स्त्री आणि नगरवधू होती. ती वैशालीच्या धनवान, शक्तिशाली लोकांचे आणि राजकुमारांचे मनोरंजन करत होती. एके दिवशी तिच्या दरवाजावर एक भिक्षुक भिक्षा मागण्यासाठी आला. त्याला पाहताच आम्रपाली त्याच्या प्रेमात पडली. ती दररोज राजकुमार, धनवान लोकांना पाहत होती, परंतु भिक्षापात्र हातामध्ये घेतलेल्या भिक्षुकामध्ये तिला अपर प्रेम आणि सौंदर्य दिसून आले.

  तिने भिक्षुकाला विनंती केली - 'कृपया, घरात येउन माझे दान ग्रहण करा.'

  पुढे वाचा, त्यानंतर काय घडले...
 • Story Of Buddhist Amrapali Monk
  त्या भिक्षुकामागे इतरही अनेक भिक्षुक होते. त्या सर्वांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तरुण भिक्षु आम्रपालीच्या महालात भिक्षा घेण्यासाठी गेल्यानंतर सर्वजण ईर्ष्या आणि क्रोधाने लाल झाले होते.

  भिक्षा दिल्यानंतर आम्रपाली त्या भिक्षूला म्हणाली की - 'तीन दिवसानंतर पावसाळा सुरु होत आहे. हे चार महिने तुम्ही माझ्याकडे वास्तव्य करावे अशी माझी इच्छा आहे.'

  युवक भिक्षु म्हणाला - 'मला यासाठी माझ्या गुरूंकडून परवानगी घ्यावी लागेल. जर त्यांनी मला येथे राहण्याची परवानगी दिली तरच मी राहण्यासाठी येईल.'
 • Story Of Buddhist Amrapali Monk
  तो आम्रपालीच्या महालातून बाहेर पडताच इतर शिष्यांनी त्याला महालात काय घडले हे विचारले. त्याने आम्रपालीने व्यक्त केलेली इच्छा सर्वांना सांगितली. हे ऐकून सर्व भिक्षुंना खूप राग आला. ते एक दिवसच आम्रपालीला पाहून तिच्यावर घायाळ झाले होते आणि याने चार महिन्यांची तयारी केली होती. युवक भिक्षु बुद्धांपर्यंत पोहोचण्याच्या आधीच इतर भिक्षु त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सर्व घटना जास्त वाढवून सांगितली. ती एक वेश्या असून चार महिने तिच्याकडे एक भिक्षु कसा काय राहू शकतो असा प्रश्न त्यांनी भगवान बुद्धांसमोर उपस्थित केला ?

  भगवान बुद्ध म्हणाले - ' शांत व्हा, पहिले त्याला माझ्याकडे येऊ द्या. त्याने तेथे थांबण्याचा निर्णय अजूनही घेतलेला नाही, मी परवानगी दिल्यानंतरच तो तेथे जाणार आहे.'

  युवक भिक्षु तेथे आला आणि त्याने बुद्धांचे चरण स्पर्श करून सर्व घटना सांगितली. 'आम्रपाली येथील नगरवधू असून तिने माझ्याकडे चार महिने तिच्या महालात राहण्याची विनंती केली आहे. सर्व भिक्षु कोणाच्या न कोणाच्या घरी राहणार आहेत. मी तिला तुमची परवानगी मिळाली तरच येथे येईल असे सांगितले आहे.

  भगवान बुद्धांनी त्याच्या डोळ्यात पहिले आणि म्हणाले - ''तू तेथे चार महिने राहण्यासाठी जाऊ शकतोस'
 • Story Of Buddhist Amrapali Monk
  बुद्धांचे शब्द ऐकून सर्व भिक्षुंना आश्चर्याचा धक्का बसला. तीन दिवसानंतर तो भिक्षु आम्रपालीच्या महालात राहण्यासाठी गेला. इतर भिक्षु नगरात चालू असलेल्या चर्चा भगवान बुद्धांना सांगू लागले. भगवान बुद्ध त्यांना म्हणाले - 'तुम्ही तुमच्या दिनचर्येचे पालन करत राहा. मला माझ्या शिष्यावर पूर्ण विश्वास आहे. त्याच्या मनामध्ये कोणतीची इच्छा नसल्याचे मला त्याच्या डोळ्यामध्ये दिसले आहे. मी त्याला परवानगी दिली नसती तरी त्याला वाईट वाटले नसते. मी त्याला परवानगी दिली आणि त्यानंतर तो गेला आहे. मला त्याच्या ध्यान आणि संयामावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही एवढे चिंताग्रस्त का झाला आहात? तो त्याच्या संयमावर अटळ असेल तर आम्रपालीसुद्धा त्याच्यावर प्रभावित झाल्याशिवाय राहणार नाही. ही त्याच्या परीक्षेची वेळ आहे. फक्त चार महिने वाट पाहा, मला त्याचाय्वर पूर्ण विश्वास आहे. तो माझ्या परीक्षेत उत्तीर्ण होईल.
   
 • Story Of Buddhist Amrapali Monk
  चार महिन्यानंतर भिक्षु आश्रमात परत आला आणि त्याच्या मागेच आम्रपाली भगवान बुद्धांकडे आली. आम्रपालीने बुद्धांकडे भिक्षुणी होण्याची इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली - 'तुमच्या भिक्षूला माझ्याकडे आकर्षित करण्यासाठी मी सर्व प्रयत्न केले परंतु मला यश आले नाही. त्याचा आचरणाने माझे मन बदलले असून तुमच्या चरणातच सत्य आणि मुक्तीचा मार्ग असल्याचा मला साक्षात्कार झाला आहे. मी माझी सर्व संपत्ती भिक्षु संघासाठी दान करत आहे.

  आम्रपालीचा महाल चातुर्मासमध्ये सर्व भिक्षूंचे निवासस्थान बनले आणि पुढे चालून बुद्धांच्या संघात सर्वात प्रतिष्ठित भिक्षुणी म्हणून आम्रपालीचे नाव झाले.
   

Trending