आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासूरजबारी- कच्छच्या मिठागरामध्ये कष्ट करणार्या आगरी समाजाकडून देशातील 75 टक्के मीठ उत्पादन केले जाते. या ठिकाणी काम केल्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परीणाम होत असतो. त्याचे हात-पाय काडीसारखे कडक होऊन जातात. एवढेच नव्हे तर पाय एवढे कठीण होतात की, मृत कामागारांचे अंत्यविधीत पाय जळतही नाहीत. अंत्यविधीनंतर नातेवाईक पायाचे अवशेष गोळा करून खड्डय़ात मीठ घालून त्यांना ते पुरावे लागतात, असे येथील कामगारांनी सांगितले.
अहमदाबादपासून 150 कि.मी. अंतरावरील सूरजबारी खाडी परिसरात आगरी समाज अनेक वर्षांपासून येथे काम करत आहेत. येथील जमिनीतील पाणी समुद्राच्या पाण्यापेक्षा दहापट खारे आहे. बोअरमधून काढलेले पाणी 25 बाय 25 मीटरच्या शेतात पसरवले जाते. सूर्य उगवल्यानंतर त्याचे चमकदार मिठात रूपांतर होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.