आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडिलांनी स्टेशनवर फेकली नकोशी, भटक्या कुत्र्यांनी केले असे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुत्र्यांनी त्या मुलीचे संरक्षण केले. - Divya Marathi
कुत्र्यांनी त्या मुलीचे संरक्षण केले.
माणसाचा सच्चा मित्र म्हणूनही कुत्र्यांना ओळखल्या जाते. त्यांच्या प्रामाणिकपणाची उदाहरणे दिली जातात. ते केवळ आपल्या मालकाप्रतीच नाही, तर कुणाशीही प्रामाणिक राहू शकतात याची प्रचिती कोलकात्यातील एका घटनेवरून आली आहे. यात कुत्र्याने माणसापेक्षा जास्त माणुसकी दाखवली. ज्या ठिकाणी माणसंही मदतीसाठी पुढे येत नव्हते. त्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी आपला सुज्ञपणा दाखवला आहे. 
 
 
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून हावडा स्टेशनची एक पोस्ट शेअर केली जात आहे. त्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा समूह जमीनीवर असलेल्या एका बाळाच्या भोवती दिसत आहेत. याबाबत अशी माहिती समोर आली आहे, की आई-वडील एका नवजात मुलीला रस्त्यावर सोडून निघाले. स्वतःला माणूस म्हणणाऱ्या एकाने पुढे येऊन त्या बाळाची मदत केली नाही. भटक्या कुत्र्यांना ही बाब लक्षात आली. त्यांनीच संबंधित मुलीवर घेराव टाकला आणि तिला सुरक्षित केले. मदतीसाठी कुणीतरी येईल याची ते वाट पाहत होते. 
 
 
काही वेळातच तेथील रेल्वे पोलिस फोर्सला ही बाब समजली. त्यांनी जवळ जाऊन मुलीला उचलले आणि रुगणालयात उपचारासाठी दाखल केले. डॉ. मिहीर दास यांनी सांगितल्याप्रमाणे, ती मुलगी 6 महिन्यांची आहे. तिला उपचारानंतर चाइल्डलाइनला सुपूर्द करण्यात आले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...