आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Striking Photographs Of The Mysterious Islamic The Tuareg

घटस्फोटानंतर पालक देतात मुलीला पार्टी, महिलांना विवाहबाह्य संबंध ठेवण्याची मुभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सहाराच्या मरुस्थळमध्ये राहणा-या एका जमातीतील महिला)
एका फोटोग्राफरने आफ्रिकेच्या नायजरमधील सहारा मरुस्थळमध्ये राहणा-या अनोख्या जमातीचे काही फोटो काढले आहेत. ही इस्लामिक जमात असली तरी त्यांच्या प्रथा आणि राहणीमान मात्र बरेच भिन्न आहे. या जमातीतील महिला विवाहानंतरही इतर पुरुषांबरोबर शारिरीक संबंध ठेवू शकतात. तसेच या जमातीतील महिलांना इतरवेळी बुर्खा न घालण्याचेही स्वातंत्र्य आहे. घटस्फोट झाल्यास या महिला सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतात. शंभर वर्षे जून्या या जमातीला तुआरेग या नावाने ओळखले जाते. या समाजात महिलांचा अधिक दबदबा असल्याने महिलाच अधिक निर्णय घेतात. विशेष म्हणजे घटस्फोटानंतर पालक मुलीला पार्टी देतात.
विशेष म्हणजे महिलांना बुरख्याचे बंधन नसलेल्या या जमातीतील पुरुष बहुतांशवेळा चेहरा झाकून असतात. फोटोग्राफर हेनरीटा बटलरने सर्वात आधी या जमातीतील लोकांना पाहिले होते. त्यांच्याबरोबर काही काळ राहून तिने त्यांचे जीवन कॅमेऱ्यात टिपले होते.
येथे लग्नापूर्वी महिलेला हवे तेवढे प्रियकर ठेवण्याची मुभा आहे. तसेच प्रियकर प्रेयसीबरोबर तिच्या घरी रात्रही घालवू शकतो. यादरम्यान घरातील लोक त्यांना काही माहितीच नाही असे वागतात. या जमातीतील लोक फार विनम्र असल्याचे फोटोग्राफरचे म्हणणे आहे. येथील तरुणींना वयाच्या २० वर्षांपर्यंत विवाह करता येत नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या जमातीतील काही फोटो...