आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: फ्रेंच फोटोग्राफरने दाखवली अफगाणिस्तानच्या जमातीची अशी LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अफगाणिस्तानच्या सुदूर परिसरात राहणारा खानाबदोश समुदाय
पॅरिस- फ्रेंच फोटोग्राफरने अफगाणिस्तानच्या वखान कोरिडोरमध्ये राहणा-या खानाबदोश समुदायाचे फोटो क्लिक केले आहेत. फोटोग्राफर वॅरियल केड्रिक यासाठी गाढवांची स्वारी करावी लागली. त्याने गाढवांवरच कॅमेरा आणि इतर सामान ठेवले आणि अफगाणिस्तानच्या उत्तर-पूर्वच्या शेवटच्या भागात स्थित वखान कोरिडोरमध्ये पोहोचला. 37 वर्षीय फोटोग्राफरने जवळपास एक महिना या समुदयासोबत वेळ घालवून त्यांचे आयुष्य कॅमे-यात कैद केले. खानाबदोश समुदयाने स्वत:चे प्रिंटेड फोटोदेखील पाहिले. हे लोक शेती करतात आणि प्राणी पाळतात. यावर यांचे जीवन अवलंबून आहे.
रिपोर्टनुसार, हा समुदाय तसेच आयुष्य जगत आहे, जसे त्यांचे पूर्वज अनेक वर्षांपूर्वी जगत होते. फोटो चार्ज करण्यासाठी फोटोग्राफरने स्वत:सोबत सोलर पॅनलसुध्दा ठेवले होते. फोटोग्राफरच्या सांगण्यानुसार, त्याला हे ठिकाण प्रसन्न वाटले, येथे पाहूण्यांचे स्वागत आणि पाहूचार पाहून त्याला आनंद झाला. फोटोग्राफरने क्लिक केलेले फोटो एन अदर अफगाणिस्तान प्रोजेक्टमध्ये सामील केले. त्याने याला सेलिब्रेशन ऑफ ब्यूटी अँड सिंप्लीसिटी करार दिला आहे.
फोटोग्राफरने सांगितले, की या फोटोंसाठी त्याला दूरपर्यंत पायी चालत जावे लागत होते, परंतु त्या बदल्यात जे मिळाले ते खूप काही आहे. खानाबदोश समुदायाचे लोक खडकांमध्ये राहतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अफगाणिस्तानच्या या ट्राइब्सचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...