आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stunning Pictures Capture Day to life Of Australia\'s Cowboys

अतिशय कठिण आयुष्य जगतात काउबॉय, फोटोग्राफरने दाखवली LIFE

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी. 'काउबॉय' शब्द स्टायलिश आणि किंग साइज आयुष्य जगणा-यांची प्रतिमा मनात अगदी फिट बसलेली आहे. डोक्यावर हॅट, तोंडात सिगार, Gum Boot घालून घोड्यावर स्वार झालेली व्यक्ती...! जास्तित जास्त लोकांच्या मनात हीच इमेज आहे. भारतात काउबॉयची ही प्रतिमा प्रसिध्द अभिनेते फिरोज खान यांनी तयार केली. मात्र हकीकत यापेक्षा वेगळी आहे. फोटोग्राफर Hakan Ludwigsonव्दारा काढलेल्या फोटोकडे पाहून याचे सत्य माहित होते.
प्राण्यांची देखरेख करणारे-
हा शब्द 19व्या शतकाच्या अखेर प्रसिध्द झाला होता. नॉर्थ अमेरिकेत फार्ममध्ये प्राण्यांची देखरेख करणारे आणि त्यांना पाळणा-यांना काउबॉय म्हटले जात होते. हे लोक घोड्यावर बसून काम पार पाडत होते. यापूर्वी हे काम स्पेनमध्ये सुरु झाले होते, हे ट्रेंड हळू-हळू अनेक यूरोपीय देश आणि अमेरिकेत पोहोचला. काउबॉय नेहमी आपले करिअर किशोरावस्थेत सुरु करत होते. या कठिण कामात हातखंड मिळवल्यानंतर त्यांना मजूरी दिली जात होती. फिट असल्यास ते गुरांची आणि घोड्यांची आयुष्यावर देखरेख करत होते. नंतर हे काम मुलीदेखील करू लागल्या होत्या.
सिनेमांचा भाग बनले-
पुढे चालून काउबॉयचे आयुष्य सिनेमांचा एक भाग बनले. आधी खलनायक आणि नंतर हिरोच्या रुपात यांना सादर करण्यात आले. बॉलिवूडमध्ये फिजोर खान यांनी काउबॉयची प्रतिमा लोकप्रिय बनवली. स्टायलिश ड्रेसेस त्यांनी हीरो आणि खलनायकाच्या स्टीरियोटाइफ प्रतिमेत नवीन रंग आणले.
Hakan Ludwigsonने केले कॅमे-यात कैद-
ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागात आजसुध्दा काउबॉय प्राण्याची देखरेखीचे काम करतात. फोटोग्राफर Hakan Ludwigsonने 1980मध्ये ऑस्ट्रेलियाच्या लाल जमीनीचे छोटे शहर Vanersborgमध्ये तीन महिने काउबॉयमध्ये राहून त्यांचे आयुष्य समजून घेतले. त्याने दिवसातील 12 तास काउबॉयसोबत घालवले आणि त्यांचे आयुष्य कॅमे-यात कैद केले. नंतर Hakan त्याचा देश स्वीडनला परतला आणि ही छायाचित्रे Balls And Bulldust या पुस्तकात सामील केली. ही छायाचित्रे ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागातील लोकांच्या आयुष्याचे कठिण साक्षीदार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा काउबॉयचे कठिण आयुष्य व्यक्त करणारे फोटो...