आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Surprising 'fake' Swimming Pool Is A Art In Kanazawa' Japan

या अनोख्या स्विमिंग पूलमध्ये उतरल्यानंतर ओले होणार नाहीत तुमचे कपडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपानच्या कनाजावामध्ये एका अनोखे स्विमिंग पूल आहे त्यामध्ये उतरल्यास तुमचे कपडे ओले होणार नाहीत. या स्विमिंग पूलामध्ये तुम्ही पाण्याचा आनंद घेऊ शकता. हा स्विमिंग पूल 21व्या शतकातील म्यूझिअमध्ये स्थायिक आहे. जेव्हा तुम्ही पूलाच्या डेकवर असता तेव्हा तुम्हाला तो पूर्ण पाण्याने भरलेला दिसतो. परंतु यात उतरल्यानंतर तुम्हाला धक्काच बसतो. हा स्विमिंग पूल एका आर्टिस्ट लिन्ड्रो इर्लिचने तयार केले आहे.
म्यूझिअमच्या कोर्टयार्डमध्ये चून्याच्या दगडांनी स्विमिंग पूलाची एक फ्रेम बनवली आहे. जेव्हा याला डेकवरून बघितल्या जाते तेव्हा तो खूप खोल दिसतो आणि पाण्याने भरलेला दिसतो. वास्तवात पारदर्शी आरशांनी केवळ 10 सेमी पाण्याने भरलेली एक लेअर आहे. वाकलेल्या आरशांमध्ये पाणी भरले जाते त्यामुळे पाण्याची सखोलता जास्त दिसते. या आरशांच्या खाली एक पोकळी असून त्याच्या भिंती एक्वामरीन आहेत. या पोकळीमध्येसुध्दा लोक जाऊ शकतात. हे आर्टीफिशिअल पूल खूपच अनोखे आणि सुंदर दिसते.
अनोख्या स्विमिंग पूलाची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...