आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीचवर सापडलेल्या या रहस्याने उडाली होती झोप, वाचा काय आहे यामागचे सत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आतापर्यंत अनेक लोकांनी एलियन्स किंवा युएफओ बघितल्याचा दावा केला आहे. पण याचा पुरावा काहीही नाही. न्युझिलंडच्या ऑकलंडमध्ये समुद्र किनारी सापडलेल्या विशाल रहस्यमयी ऑब्जेक्टने प्रशासनाची झोप उडवली होती. एलियन्स वापरत असलेले हे टाईम कॅप्सुल आहे असे काही लोकांचे म्हणने होते.
भूकंपानंतर समोर आली होती रहस्यमयी बाब
न्युझिलंडच्या मुरीवाय बीचवर फिरायला गेलेली मेलिसा डबलडे हिला तब्बल 5 किलोमीटर दूरुनच हा ऑब्जेक्ट दिसला होता. त्यावर लहान-मोठे समुद्री जीव चिकटले होते. तिने लगेच त्याचा फोटो काढला. फेसबुकवर टाकला. कुणाला माहिती आहे का, की हे काय आहे... असे तिने त्या फोटोखाली लिहिले होते. त्यावर काहींनी लिहिले होते, की मॉन्स्टर तर काहींनी कॅरिबियन वॉलरस. काहींनी याला एलियन्सचे टाईम कॅप्सूल म्हटले होते.
भूकंपानंतर समोर आली ही बाब
न्युझिलंडमध्ये जोरदार भूकंप आला होता. जनजीवन याने प्रभावित झाले होते. त्यामुळे भूकंपामुळे समुद्रातून एखादा जीव बाहेर आला असावा असा कयास काही लोकांनी व्यक्त केला होता.
अखेर काय आहे सत्य
हा व्हेलचा मृतदेह असावा. लाटांनी तो समुद्राबाहेर फेकला गेला असावा, असे मेलिसाला सुरवातीला वाटले होते. पण हा व्हेलचा मृतदेह नव्हता की टाईम कॅप्सुल. हा विशाल ऑबजेक्ट म्हणजे लाकडाचा एक तुकडा होता. काही वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या सहाजाचा तो एक तुकडा होता. भूकंप झाल्यानंतर तो समुद्र किनारी आला होता. त्यावर अनेक समुद्री जीव लटकले होते.
पुढील स्लाईडवर बघा, या रहस्यमयी ऑब्जेक्टचे आणखी काही फोटो....
बातम्या आणखी आहेत...