आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Taiwanese Village Transforms Itself With Cartoon Murals

PHOTO : तीन बहिणींनी चित्रांनी सजवले तैवानमधील गाव, पर्यटकांची लागली रांग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तैवानमधील हुइजा गावाचे सौंदर्य गेल्या काही दिवसांपासून खूपच खुलून दिसते आहे. येथील घरांच्या प्रत्येक भिंतीवर कार्टून्सची रंगीत रेखाचित्रे तयार करण्यात आली आहेत. गावात डोळ्यांना सुखावणारे रंगीबेरंगी वातावरण पसरल्याचे दिसून येते.
प्रत्यक्षात काही दिवसांपूर्वी तीन बहिणी येथे सुट्या घालवण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी आजीच्या घरातील भिंतींवर कार्टूनची रेखाचित्रे आणि दारमा डॉल्सच्या पेंटिंग्ज तयार केल्या. या पेंटिंग्ज सौभाग्याचे प्रतीक समजले जाते. यात एक खिडकीही होती. तेथून त्यांची आजी बाहेर पाहत असे. या बहिणी गेल्यानंतर गावातील लोकांना पेंटिंग्ज खूप आवडल्या. एक-एक करून सर्वांनी त्यांच्या घराच्या भिंतींवर कार्टूनची रेखाचित्रे काढली. पाहता-पाहता पूर्ण गाव रंगीत होऊन गेले. ही बातमी प्रसिद्ध होताच पर्यटकांची संख्या वाढली. एका पर्यटकाने याची सुरुवात केली तेव्हा त्या तिघी बहिणींची नावे समोर आली. आता लोक या गावाला "मोस्ट कलरफुल व्हिलेज' म्हणतात.
पुढील स्‍लाईडवर पाहा तैवानमधील या गावाची छायाचित्रे...