(16 वर्षीय मुलाचे प्राण वाचवताना फायर ब्रिगेडचा जवान)
जगात काही लोक असे आहेत, जे अॅडव्हेंचरच्या नावावर स्वतःचा जीव धोक्यात घालत असतात. यापैकी काहींना
आपल्या प्राणांना मुकावे लागते, तर काही नशीबाने बचावतात. असेच काहीसे घडले आहे ऑस्ट्रेलियातील सिडनीत येथे.
16 वर्षीय ब्लॅक हेज नावाचा तरुण आपल्या मित्रासोबत सिडनीतील टुरीमेटा हॅड या ठिकाणी गेला होता. येथे हा तरुण 13 मीटर उंच असलेल्या पर्वतावरून खाली कोसळल्याने बेशुद्धावस्थेत पडला होता.
फायर ब्रिगेडच्या जवानाने आपला जीव धोक्यात घालून ब्लॅक हेजचे प्राण वाचवले. त्या जवानाने त्याला स्ट्रेचरच्या साह्याने हेलिकॉप्टरमध्ये पोहोचवले. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील छायाचित्रकार अॅडमने हे छायाचित्र काढले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अॅडम यांनी क्लिक केलेली छायाचित्रे...
फोटो साभार- guardian.com