आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉप 10: या आहेत भारतातील सर्वात भयावह आणि धोकादायक जून्या वास्‍तू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण 21 व्‍या शतकात जगत आहोत. विज्ञानामुळे प्रगती मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रत्‍येक घडणारी घटना किंवा होणारा बदल याला विशिष्‍ट कारण असते. कार्यकारणभाव असल्‍याशिवाय कोणतीच घटना घडत नाहीत, हे विज्ञानामुळे सिद्ध झाले आहे. वेगवेगळे शोध लागले असले तरी अंधश्रद्धा मात्र जगभरामध्‍ये आजही पाळली जाते. विज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. हा वापर होत असला तरी अंधश्रद्धा मात्र वाढत चालल्‍याचे चित्र आपल्‍या देशामध्‍ये पाहायला मिळते. भारतील लोक आजही भुत-बाधा या गोष्‍टीवर विश्वास ठेवतात. भुता-खेताच्‍या गोष्‍टी आवडीने ऐकायला भारतीय लोकांना आवडतात.
आज आम्‍ही तुम्‍हाला देशातील अशा दहा इमारतीची माहिती देणार आहोत. ज्‍या इमारतीमध्‍ये भुत-प्रेत असल्‍याची चर्चा लोक करतात. सध्‍या या इमारती देशभर चांगल्‍याच गाजत आहेत. या इमारतीमध्‍ये आत्‍मा भटकत राहात असल्‍याची चर्चा सध्‍या देशभर आहे. आज आम्‍ही आपल्‍यासाठी भयावह आणि धोकादायक म्‍हणून प्रसिद्ध असलेल्‍या दहा इमारतीची माहिती देणार आहोत.

भानगढचा किल्‍ला-
राज्‍यस्‍थामधील भानगढचा किल्‍ला सर्वात धोकादायक असल्‍याची चर्चा होते. काही वर्षापुर्वी रत्‍नावती नावाची सुंदर राजकुमारी या किल्‍ल्‍यात राहत होती. ही राजकुमारी एका तांत्रीकाला आवडल्‍यामुळे त्‍याने तिच्‍यावर काळी जादू केली असल्‍याचे सांगितले जाते. या राजकुमारीला आपल्‍या जाळ्यात ओढून तांत्रिकाने शारिरिक शोषण केले. काही दिवसात मात्र या तांत्रिकाचा मृत्‍यू झाला. या तांत्रिकाचा आत्‍मा आजही या किल्‍ल्‍यात भटकत असल्‍याचे सांगितले जाते. यामुळे पर्यटकांना रात्री भानगढावर जाऊ दिले जात नाही.
आणखी वाचा पुढील स्‍लाईडवर...