(म्हशींना घाबरून पळणारा सिंह)
जंगलात सिंहाचे राज्य चालते आणि त्याच्या एका डरकाळीने अख्खे जंगल हादरून जाते, असे म्हणले जाते. सिंह कोणत्या प्राण्याला
आपला शिकार बनवू शकतो, एवढी ताकद त्याच्यात असते. मात्र अनेकदा त्याला छोट्या-छोट्या प्राण्यांपुढे पराभव स्वीकारावा लागतो. अशीच एक घटना केन्याच्या मसाई मारामध्ये समोर आली आहे. झाले असे, की सिंह आणि सिंहीण जंगली म्हशींची शिकार करण्यासाठी म्हशींच्या घोळक्यात पोहोचले. सिंह आणि सिंहीण शिकार करणार तोच म्हशींची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांनी पलटवार केला.
म्हशींच्या पलटवारानंतर सिंहीण पळून गेली, परंतु सिंह शिकार करण्याचा प्रयत्न करत राहिला. मात्र म्हशींच्या घोळक्याने त्याच्यावरही पलटवार केला. सिंहाला भिती वाटली आणि त्याने तिथून पळ काढला. सिंहाच्या चेह-यावर भिती दिसून येत होती. सिंह स्वत:ची शिकार होण्यापासून वाचवत होत असे दिसून येत होते. म्हशींनी दूरपर्यंत त्याचा पाठलाग केला.
या घटनेची छायाचित्रे फोटोग्राफर्स लॉरेन्ट रेनॉड आणि डेमिनिक हॉशन यांनी कैद केली. 55 वर्षीय रेनॉड यांनी सांगितले, जेव्हा म्हशींचा घोळका सिहांचा पाठलाग करत होता, तेव्हा सिंहाच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होते, तो घाबरलाय. सिंह झाडांमध्ये जाऊन लपला आणि म्हशींनी त्याचा पाठलाग सोडला. मात्र सिंहाने म्हशींवर पुन्हा हल्ला करण्याची हिम्मच दाखवली नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या घटनेची छायाचित्रे...