आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrifying Hyper Realistic Sculpture Of A Fallen Angel By Beijing Artists

या स्कल्पचरमध्ये कुणाचे रुप आहे, मनुष्य की प्राणी?, PHOTOS झाले VIRAL

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीनच्या बीजिंगमध्ये राहणारे आर्टिस्ट्स सुन युआन आणि पेंग यूने बनवलेल्या एका असामान्य स्कल्पचरचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. हे स्कल्पचर पाहिल्यास गोंधळच उडतो. या स्कल्पचरची रचना पुरुषांची आहे की महिलेची, परंतु काहीवेळ एखादा प्राणी असल्याचाही भास होतो. एका सोशल साइटवर एका दिवसात हा फोटो एक लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला.
सुन आणि पेंग दोघेही व्यक्तींच्या मृतदेहांचे स्कल्पचर बनवण्यासाठी अनेकदा वादात अडकले आहेत. परंतु या स्कल्पचरमध्ये त्यांनी असे काही न करता वेगळीच कल्पना वापरली आहे. स्वत: आर्टिस्ट्सने या स्कल्पचरला एक माहिला फरिश्ता म्हणून संबोधले आहे. याला सिलिका जेल, फायबरग्लास, स्टेनलेस स्टीलपासून बनवण्यात आले आहे.
सोशल साइटवर या स्कल्पचरवर प्रतिक्रिया देताना एका व्यक्तीने लिहिले, 'हे खूप सुंदर आहे आणि सोबतच उदाससुध्दा.' अनेक लोकांनी या फरिश्ताला चिकन विंग्ससोबत दाखवल्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेत एका दुस-या व्यक्तीने प्रतिक्रिया दिली, 'हे स्कल्पचर एक महान लेखक गॅब्रिअल गार्जिया मार्केजच्या एका रचनेशी प्रभावित असल्याचे वाटते.' त्याने लिहिले, की गार्सियाच्या 'ए व्हेरी ओल्ड मॅन विद इनॉरमस विंग्स'ने प्रेरित असू शकते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या विचित्र स्कल्पचरचे काही PHOTOS...