आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thai Cook Fries His Own Hands, Don\'t Try This At Home

उकळत्या तेलात हात घालून तळतो चिकन, बसत नाहीत चटके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात अनेक कारनामे करणारे लोक आपल्याला दिसतात. आपल्या आजूबाजूलासुध्दा असे लोक असतात. त्यांच्या कारनाम्यांचे आपल्याला कौतुकही वाटते. अशीच एक व्यक्ती आहे, तिच्या कृत्याचे कौतुकच नव्हे तर नवलही वाटेल. या व्यक्तीचे नाव त्रिचान आहे.
त्रिचान थायलँडच्या चियांग माइचा रहिवासी असून त्याचे वय 50 वर्षे आहे. त्रिचान उकळत्या तेलात हात घालून चिकन तळतो. परंतु त्याला या उकळत्या तेलाचा जराही त्रास होत नाही. तो चिकन तळत असताना काही क्षण त्याचे हात लोखंडाचे आहेत, की काय असे वाटते.
थायलँडचा त्रिचान मागील अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करत आहे. त्याच्या या चित्र-विचित्र पध्दतीमुळे रोज ग्राहकांची चिकन खाण्यासाठी गर्दी असते. इतकेच नव्हे त्रिचान उकळत्या तेलात हात घालून 1 मिनीटांत 20 चिकनचे पीस तळून बाहेर काढतो. याचा त्याने रेकॉर्डसुध्दा बनवला आहे.
त्याचा हा कारनामा पाहून आश्चर्य वाटते. त्रिचानला ही देवाकडून मिळालेली भेट म्हणा अथवा त्याचे वर्षानू वर्षे करत असलेला सराव म्हणा. परंतु हा महाशय आपल्या विचित्र कृत्यासाठी जगभरात ओळखला जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा त्रिचान कशाप्रकारे उकळत्या तेलात हात घालून चिकन तळतो...