आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

42 वर्षांपासून झोपली नाही ही व्यक्ती, तरीसुध्दा नॉर्मल आहे आयुष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(व्हिएतनामचा थाई नगोक)
हनोई- कुणी 42 वर्षे न झोपता जिंवत राहू शकतो? कदाचित नाहीच. परंतु व्हिएतनामचा रहिवासी थाई नगोकचे आयुष्य काहीसे असेच आहे. ही व्यक्ती गेल्या 42 वर्षांपासून झोपलेली नाहीये. एवढ्या दिवसांत त्याने एक मिनीटसुध्दा झोप घेतलेली नाहीये. व्हिएतनामच्या नॉन सोंग जिल्ह्याच्या क्यू ट्रंग कम्यूनचा रहिवासी नगोकचा जन्म 1942मध्ये झाला होता. त्याने सांगितले, की 1973मध्ये त्याला ताप आला होता, त्यानंतर तो कधीच झोपू शकला नाही.
झोप न आल्याने हैराण झालेल्या नगोकने अनेकदा उपचार घेतले. डॉक्टरांनी हा इनसोम्निया आजार असल्याचे सांगितले, या आजाराने झोप येत नाही. त्याने सांगितले, की सुरुवाताली मी हैराण झालो होतो. रात्रभर तणावात राहत होतो. परंतु हळू-हळू मला याची सवय पडली. आता मला कोणताच त्रास होत नाही. जगभरात काही असे लोक आहेत, जे नगोकसारख्या आजारांनी त्रस्त आहेत.
रात्र घालवणे कठिण-
नगोकने सांगितले, की दिवसभर काम केल्याने वेळ कसा जायचा कळत नव्हते. परंतु रात्री एक-एक क्षण घालवणे माझ्यासाठी कठिण झाले होते. मात्र, मी रात्री वेळ घालवण्यासाठी शेतात काम केले. मला कधीच थकवा जाणवत नाही. मात्र कधी-कधी रात्री घरी असलो तर स्मोकिंग आणि चहा पिऊन वेळ घालवतो.
थकवा येत नाही-
6 मुलांचा वडील नगोकाने सांगितले, की इतर लोकांना झोप न आल्याने थकवा जाणवतो, मात्र मला मूळीच थकवा जाणवत नाही. दिवस असो अथवा रात्र तो काम करत राहतो. वयाच्या 73व्या वर्षीसुध्दा तो अगदीच ठणठणीत आहे. नगोकचे म्हणणे आहे, की ज्या रात्री काहीच काम राहत नाही तेव्हा तो उदास होतो. 2010मध्ये अनेक विदेशी मासिकाने नगोकच्या फोटोंना असामान्य म्हणून छापले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा थाई नगोकचे काही PHOTOS...