आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: वयाच्या दुस-या वर्षी सेलिब्रिटी बनली ही चिमुकली, 1 लाख फॉलोअर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सेलिब्रिटी झालेली चिमुकली)
सिडनी- सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांमुळे केवळ दोन वर्षांची एक मुलगी मॉडेल म्हणून चर्चेत आली आहे. इतक्या कमी वयात तिच्याकडे डिझाइनर ज्वेलरी, मिनी मर्सडिज कार आणि इंस्टाग्रामवर 1,15,000 फॉलोअर्स आहेत.
उत्तर सिडनीमध्ये राहणारी मिली बेले डायमंड सोशल मीडियावर सेलिब्रिटी झाली आहे. या चिमुकलीची आई शाई फॉक्सने तिची काही गोंडस छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. लोकांचा तिच्या या छायाचित्रांना मोठा प्रतिसाद मिळाला. तिला लोकांनी मॉडेल बनवले. या मुलीच्या नावाने इंस्टाग्रामवर अकाऊंट बनवण्यात आले आहे. तेव्हा ती केवळ दोन वर्षाची होती.
मात्र सुरुवातील चिमुकलीच्या आईने तिची फोटो आपल्या नातेवाईकांना दाखवण्यासाठी केले होते. परंतु हळू-हळू ही चिमुकली आपल्या गोंडस लूकने प्रसिध्द होत गेली. जसे-जसे या चिमुकलीचे चाहते वाढत गेले, तसे अनेक फॅशन लेबल आणि चिल्ड्रेन ब्राँड तिली महागडे गिफ्ट पाठवायला लागले. चिमुकलीची आई प्रत्येक भेटवस्तूसोबत तिचा एक फोटो पोस्ट करण्यासाठी तब्बल 15000 हजार रुपये घेते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या निरागस चिमुकलीचे PHOTOS...