आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे अनोखा रेल्वे ट्रॅक, येथे घर आणि दुकानांजवळून धावते ट्रेन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- हनाईच्या एका कॉलोनीमध्ये रेल्वे पटरीवर खुर्ची टाकून आराम करताना नागरिक)
रेल्वे ट्रॅकॉवर ऊन खात बसणे, खुर्ची टाकून गप्पा मारत बसणे, कधी-कधी पटरीवर फिरणे. असे चित्र कधी कुठे पाहिले आहे का? अशी जोखिम पत्कारण्याची कुणाचीच हिम्मत होणार नाही. परंतु तुम्ही हे जाणून हैराण व्हाल, की अशा जोखिम पत्कराण्याची अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये एक जूनी गल्ली आहे. या गल्लीतून एक रेल्वे ट्रॅक जाते. या ट्रॅकवरून रेल्वेसुध्दा धावते. जेव्हा कधी ही पटरी रिकामी असते तेव्हा लोक यावर बसून गप्पा मारतात, आपला वेळ घालवतात. कुणी पटरीच्या बाजूला दुकानेदेखील मांडली आहेत.
दिवसातून दोनवेळा धावते रेल्वे-
हनोईमधील लाँग बीन ब्रिजकडे जाणारा हा मार्ग जून्या शहराच्या गर्दीतील गल्लींमधून जातो. येथे दिवसातून दोनवेळा रेल्वे धावते. या रेल्वेची वेळ संध्याकाळी 4 वाजता आणि 6 वाजता आहे. हनोईचे हे सर्वात जूने क्षेत्र आहे. सरकार आदेशानुसार, या क्षेत्रात जास्त उंच इमारतींची निर्मिती केली जाऊ शकत नाही. म्हणून लोकांनी आपल्या घरांची आणि दुकांनी निर्मिती अशाप्रकारे केली आहे. येथील रहिवाशांनी लाँग बीन ब्रिजपर्यंत आपली घरे आणि दुकाने मांडली आहेत, जिथून रेल्वे धावते.
लोकांनी झाली सवय-
ट्रेन येऊन गेल्यानंतर लोक काही वेळातच पुन्हा रेल्वे ट्रॅकच्या अवती-भोवती आपल्या कार्यास सुरुवात करतात. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे, की सुरुवातीला रेल्वे ट्रॅकचा उपयोग करणे खूपच भयावह होते. परंतु आता याची सवय झाली आहे. थायलँडच्या मॅकलाँगसुध्दा रेल्वे ट्रॅकवर बनलेला आहे. येथील व्यापारी पटरीवर दुकान मांडून भाजी मंडी, अंडे, दैनंदिन सामानाच्या वस्तूसारखे इतर सामान विकाण्याचे काम करतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या अनोख्या रेल्वे ट्रॅक आणि गावाची छायाचित्रे...