(नॉर्वेच्या जेलमधील एक कैदी)
नॉर्वेमध्ये ओस्लोच्या किना-यापासून जवळपास 75 किलोमीटर दूर एका आयलँड आहे, जिथे 115 गुन्हेगारांना कैद करून ठेवले आहे. मात्र या कैद्यांना हे ठिकाण तुरुंगापेक्षा
आपले घर जास्तच वाटते. यामधील अनेकजण नॉर्वेचे क्रूर गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर खून, बलात्कार आणि ड्रग तस्करीचे गुन्हे दाखल आहेत.
परंतु सर्वात रंजक गोष्ट अशी, की या गुन्हेगारांसाठी हा तुरुंग हॉलिडे घालवण्यासारखे आहे. यांना या तुरुंगात सर्व सुख-सुविधा पुरवल्या जातात. या तुरुंगाला इतर तुरुंगांप्रमाणे उंच-उंच भिंती नाहीये. एवढेच नव्हे या कैद्यांच्या सुरक्षेसाठी कोणतेही सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आलेले नाहीये.
काय-काय करतात कैदी-
येथील कैदी छंद म्हणून मासेमारी करतात, घोडेस्वार करतात, टेनिस खेळतात आणि उन्हात समुद्रकिना-यावर अंघोळ करतात. येथे राहण्यासाठी कैद्यांना राहण्यासाठी पेटेंड लाकडांनी बनवलेले घर दिले जाते. एका घरात अनेक कैदी राहतात, मात्र प्रत्येकाची खोली वेगळी आहे. या खोलीसोबत त्यांना स्वत:चे वेगळे किचनसुध्दा देण्यात आले आहे. येथील कैदी प्राणी पाळू शकतात आणि शेतीलसुध्दा करू शकतात. खाण्यात कैदींना चविष्ट अन्न दिले जाते. या तुरुंगाचा हेतू कैद्यांना जबाबदार व्यक्ती बनवण्याचा आहे. आकड्यांनुसार, या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर खूप कमी लोक पुन्हा गुन्हा करतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कैद्यांना 'जन्नत' वाटणा-या या तुरुंगाची खास छायाचित्रे...