आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅक्सिकोच्या गुहेमध्ये आहेत 20 कोटींपेक्षा जास्त दुर्मिळ मोती, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समुद्रात मिळणारे मोती दुर्मिळ असतात आणि ते कुणालाही मिळत नाहीत. मात्र, मॅक्सिकोच्या एका गुफेमध्ये मोत्यांचा खजिना मिळाला आहे. हे वेगळ्या प्रकारचे मोती आहेत. ते छोटे आणि गोलाकार असून वाळूशी अनेक वर्षांच्या प्रक्रियेनंतर ते तयार होतात. त्यांना केव्ह पर्ल म्हणतात.
ते फक्त दुर्मिळ गुफांमध्येच सापडतात. मॅक्सिकोच्या तबास्कोमध्ये गरुता दि लास कॅनिकास म्हणजे गुफेमध्ये केव्ह पर्लचा खजिना मिळाला आहे. त्यांची संख्या २० कोटींपेक्षा जास्त असू शकते. गुफेमध्ये तळाला एक मीटर अंतरावर ते सापडले आहेत. स्थानिक लोकांना या मोत्यांची अधिक माहिती आहे. मात्र, दुसरे लोक येथे काही दिवसांपूर्वीच पोहोचले आहेत.
गुफेचे अंतर ५२९ मीटर लांब आहे आणि १७ मीटर खोल आहे. तेथेच मोती मिळाले आहेत. ते जग प्रवेशद्वारापासून १०० मीटर आत आहे. २९० वर्गमीटरमध्ये मोती विखुरलेले आहेत. त्यांचा आकार १.५ सें.मी.पर्यंत आहे. ते इतके टणक आहेत की ते तोडणे कठीण आहे. ते कसे बनले आणि येथे एकत्र कसे आले, ही माहिती कुणालीही नाही. यामुळेच लोक त्यांना पाहण्यासाठी येत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या गुहेची काही छायाचित्रे...