आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी पाहिले आहे का पृथ्वीवरील नरकाचे व्दार? जवळ जाताच होतो मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- देरवेजे गावाजवळील काराकुम वाळवंटामधील 'द रोड टू हेल')
स्वर्ग आणि नरकाविषयी आपण नेहमीच कथा, पुराण ऐकतो. सिनेमांमध्येदेखील याविषयी पाहिले आहे. भारतीय पौराणिक कथेत जसे नरकाविषयी विश्लेषण दिले आहे. तसेच ग्रीक आणि रोमन मायथोलॉजीमध्येसुध्दा स्वर्ग आणि नरकाचे विश्लेषण ऐकायला मिळते. परंतु तुम्हाला हे ठाऊक आहे का? धरतीवरसुध्दा एक नरकाचे दार आहे. आश्चर्यचकित झालात ना. तुम्हाला या नरकाच्या दाराविषयी कदाचित माहित नसेल. परंतु आम्ही तुम्हाला याविषयी सांगत आहोत. तुर्किमेनिस्तानच्या देरवेजे गावाजवळ काराकुम वाळवंट आहे. त्याला 'द रोड टू हेल' अर्थातच नरकाचे व्दार म्हटले जाते.
यूनानी मिथकोमधील नरकारचे व्दार अर्थातच पाताळमध्ये जाण्याचा रस्ता बनवण्यात आला आहे. या ठिकाणाविषयी सांगितले जाते, की जो व्यक्ती येथे येतो त्याला आपले प्राण गमवावे लागते. त्यामुळे या नरकाच्या व्दाराजवळ जाण्याआधी प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढते. तरीदेखील लोक या ठिकाणाला दूरून पाहतात. तुर्किमेनिस्तानची राजधानी अश्गाबातपासून 260 किलोमीटर उत्तरमध्ये काराकुम वाळवंट आहे. या वाळवंटात बनलेल्या खड्यामध्ये मागील 43 वर्षांपासून आग धगधगत आहे.
अशी लागली होती आग
या वाळवंटात नैसर्गिक वायू गळती झाली होती. त्याला जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा भंडार सांगितले जात होते. मिथेन वायूच्या अफाट साठा वाढवण्यासाठी 1971मध्ये सोवियत संघाचे वैज्ञानिकांनी येथे ड्रिलिंग केली होती. जास्तित जास्त वायू काढण्याच्या विचाराने एक दिवस हा साठा लीक झाला आणि विषारी वायूची गळती सुरु झाली. या घटनेत कुणाला नुकसान पोहोचले नाही. रुसी वैज्ञानिकांनी या विषारी मिथेन वायूला पसरवण्यापासून थांबण्यासाठी आग लावून दिली. तेव्हापासून येथे ही आग अशीच आहे. ज्या खड्यात ही आग लावण्यात आली, तो 229 फुट रुंद आणि जवळपास 65 फुट खोल आहे.
नरकाच्या या दाराविषयी वैज्ञानिकांचे मत खूप वेगळे आहे. त्यांच्या मते, आधुनिक काळात अशाप्रकारच्या कल्पनांना कोणतेच स्थान नाहीये. विज्ञान सांगू शकते, की पृथ्वीवर असे अनेक खड्डे आढळतात. तिथून अनेक प्रकारच्या वायूंची गळती होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नरकाच्या या दाराची काही छायाचित्रे...