आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Explorers Club Annual 110th Dinner In New York

साप-विंचू खाण्यासाठी हजारो लोकांची झुंबड, बघा या विचित्र पार्टीचे PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेमध्ये गेल्या शनिवारी एका विचित्र पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अनेक लोकांनी सहभाग नोंदवला होता. या पार्टीमध्ये विविध जीव जंतूंचे पदार्थ तयार करण्यात आले होते. एवढेच नाही तर पार्टीमध्ये 7 फुट लांबीचा अमेरिकेत आढळणारा सुसरीसारखा एक सरपटणारा प्राणी (एलिगेटर)सुध्दा जेवणात ठेवण्यात आला होता. सोबतच, साप, विंचू, खेकडे आणि झुरळासारखे प्राणीदेखील पार्टीच्या मेनूमध्ये सामील होते.
अमेरिका एक्सप्लोरर क्लबमध्ये होणारी ही पार्टी प्रत्येक वर्षी आयोजित केली जाते. क्लबची 115वी पार्टी न्यूयॉर्कच्या एस्टोरिया हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. तसे पाहता काही लोक या पार्टीच्या विरोधातसुध्दा आहेत. एका जीव संरक्षण समर्थकने हाडांनी माळ घालून निषेध व्यक्त केला.
पार्टीचे मेन्यू
पार्टीच्या मेनूमध्ये बकरीचे डोळे, मोठी कोळी, झुरळ, कासव, साप आणि विंचूसारखे अनेक प्राणी होते. त्यामध्ये 7 फुटांचे दोन एलिगेटरसुध्दा होते.
किती होते जेवण
पार्टीमध्ये एक टन जेवण बनवण्यात आले होते.
प्रसिध्द शेफने बनवले जेवण
सुप्रसिध्द शेफ जेन रुरकाने क्लबसाठी अनेक प्राण्यांपासून वेगवेगळे स्वादिष्ट जेवण तयार केले. 40 सदस्यांनी त्यांना जेवण तयार करण्यास मदत केली.
चार्ज किती
या विचित्र पार्टीमध्ये सहभागी झालेल्या लोकांनी या जेवणासाठी 375 डॉलर ते 1200 डॉलर इतका खर्च केले.
पार्टीमध्ये सहभागी लोकांची संख्या
1500च्या जवळपास लोकांनी या क्लबमधील पार्टीसाठी सहभाग नोंदवला होता.
काही दिग्दजदेखील होते सामील
या पार्टीत अंतरिक्ष यात्री मायकल लोपेज एलग्रिया, आकाशापासून 37 किमीच्या अंतरावरून सर्वाधिक गतीने हवेत उडी घेऊन खाली येणाचा विक्रम रचणारा फेलिक्स बॉमग्रार्टनर, अमेजनचे संस्थापक जेफ बीजोस यांच्यासारखे अनेक दिग्दज या पार्टीत उपस्थित होते.
100 वर्षांपेक्षा अधिक जूने आहे हे क्लब
एक्सप्लोरर क्लबची स्थापना 1904मध्ये झाली होती. हे क्लब जमिन समुद्र, हवा आणि अंतरिक्षच्या संशोधन कार्यासाठी मदत करते. त्यामध्ये आर्मस्ट्रांग, बज एल्ड्रिन, सर एडमंड हिलेरी, मैथ्यू हेनसन आणि जेम्स कॅमरॉनसारखे दिग्दजसुध्दा सदस्य होऊन गेले आहेत.
डिनरची परंपरा
एक्सप्लोरर क्लबने प्रत्येक वर्षी पार्टी देण्याची परंपरा 1930मध्ये सुरू केली होती. क्लबला यावर्षी सायबेरियामध्ये मॅमथ नावाचा प्राणी आढळला होता. क्लबच्या सदस्यांनी त्याचे मांस आणून पहिल्यांदा मोठी पार्टी साजरी केली आणि त्यानंतर ही त्यांची परंपरा झाली.
या विचित्र डिनर पार्टीचे काही छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...