आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारुण्य टिकवण्यासाठी डुकराच्या रक्ताने करते अंघोळ, स्वत:ला समजते नशीबवान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रक्ताने अंघोळ करणारी तरुणी)
19 वर्षीय एक तरुणी डुकराच्या रक्ताने अंघोळ करते, जेणेकरून तिला तरुण राहता यावे. डुकराच्या रक्ताने तारुण्य वाढते असे त्या तरुणीचे म्हणणे आहे. कॅलिफोर्नियामध्ये राहणारी कॅनल नावाची एक तरुणी फ्रिलान्स मॉडेल आणि अभिनेत्री आहे, तिच्या अशा अदावर एक टीव्ही शोसुध्दा बनला आहे. एमटीव्हीच्या रिअॅलिटी शो 'ट्रू लाइफ'मध्ये तिला विचित्र पध्दतीने डुकराचे रक्ताने अंघोळ करताना दाखवले आहे.
कॅनल सांगते, 'मी स्वत:ला अशाप्रकारे तरुण ठेवत आहे, याचा मला खूप आनंद आहे.' कॅनला मानते, की शंभर वर्षांपूर्वी लोक अशाचप्रकारे अंघोळ करायचे आणि स्वत:ला ताजेतवाणे ठेवत होते.
कॅनलची आजी लोइस याविषयी तिला याबाबत पुरावा मागते, परंतु ही तरुणी कोणताच पुरावा देत नाही. कॅनलने सांगितले, 'मला दु:ख आहे, की आजी माझ्या प्रकृतीविषयी चिंतीत असते, परंतु मला रक्ताने अंघोळ करायला आवडते. मी ते थांबवू शकत नाही.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या तरुणीची छायाचित्रे...