जगातील सर्वात लांब भिंत 'ग्रेट वॉल ऑफ चायना'विषयी सर्वांनीच ऐकलेले आहे. परंतु जगातील दुस-या सर्वात लांब भिंतीविषयी खूप कमी लोकांना माहित असेल. ही भिती दुस-या देशात नव्हे तर आपल्या भारत देशात आहे. ही राजस्थान राज्यात असलेल्या कुंभलगड किल्याची भिती आहे. ही 'ग्रेट वॉल ऑफ इंडिया' म्हणून ओळखली जाते. उदयपूरपासून 64 किमी दूर अंतरावर असलेल्या या किल्लाची निर्मिती महाराणा कुभ्भाने 15व्या दशकात केली होती. किल्ल्याचे क्षेत्रफळ 36 किमी असून ही जगातील दुसरी सर्वात लांब भिंतीच्या श्रेणीमध्ये मोडते.
कुंभलगड मेवाडच्या साम्राज्यच्या किलेबंदचा भाग होती. इथे महाराणा प्रतापचा जन्म झाला होता. किल्ल्याच्या आतमध्ये 360पेक्षा जास्त मंदिर आहेत. किल्ल्याच्या भिंतीवरून अरावली पर्वत रांगा 10 किलोमिटर दूरपर्यंत दिसतात. किल्ल्याच्या भिंतीभोवती 13 दरी आहेत. त्याच्या दारांची लांबी 36 किमी असून त्यावरून 8 घोडे एकाचवेळी जाऊ शकतात.
ग्रेट वॉल ऑफ इंडियाची काही खास आणि आकर्षक, तुम्ही न बघितलेली छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...