आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे आहे मृतदेहांना खडकांवर लटकवण्याची विचित्र प्रथा, जाणून घ्या याविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- चीनच्या सिच्युआन प्रांताचा हँगिंग कॉफिन एरिया)
हँगिंग गार्डनविषयी कदाचित सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु हँगिंग कॉफिन्सविषयी तुम्हाला काही माहित आहे का? नाही ना. आम्ही तुम्हाला सांगतो, चीनमध्ये असे एक ठिकाण आहे, जिथे मृतदेहांना शवपेटीत टांगले जाते तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु चीनच्या बो समुदायचे लोक या परंपरेला मानतात. यामध्ये मृत्यूनंतर मृतदेहांना शवपेटीत टाकून खडकांवर लटकवले जाते. त्यामध्ये काही शवपेटी 3000 वर्षे जूने आहेत. पहिल्या नजरेत पाहण्यास हा प्रसंग थोडा विचित्र वाटतो.
कब्रिस्तानसारखा आहे हा प्रांत-
चीनच्या गॉन्गजियन शहराच्या सिच्युअन प्रांतात खडकांवर बो समुदायसाठी कब्रिस्तानप्रमाणे आहे. या समुदायचे लोक कुटुंबातील सदस्यांच्या निधनानंतर त्यांचे मृतदेह शवपेटीत ठेवून खडकावर लटकवतात. तज्ञांच्या मते, मृत पावलेल्या व्यक्तीची आत्मा लवकरच देवाघरी जावी यासाठी असे केले जाते. तसेच इतर लोकांचे म्हणणे आहे, की मृतदेहांना प्राण्यांपासून वाचवण्यासाठी असे केले जाते.
लाकडापासून बनतात शवपेटीत-
या शवपेटी लाकडांपासून बनवल्या जातात आणि त्यावरील कव्हर कास्यचे असते. या परिसरात आजसुध्दा 100पेक्षा जास्त शवपेटी लटकवलेले आहेत. त्यामध्ये काही जमीनीपासून 100 मीटर तर काही 130 मीटर उंच लटकवलेले आहेत. तसेच हजारो वर्षांपूर्वीचे काही शवपेटी निरक्षणावेळी खाली पडले होते. त्यासाठी त्यांना सुरक्षित ठेवण्याचे काम केले जात आहे. मात्र, बो समुदायचे लोक आता या क्षेत्रात राहत नाहीत. आता ते लोक सिच्युआन आणि यूनान प्रांताच्या सीमेवर राहतात आणि आजसुध्दा ते आपली परंपरा बाळगतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बो समुदायच्या लोकांची परंपरा...