आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ढगांना टेकणारे हे गाव वसलय सर्वात उंच ठिकाणावर, बर्फामध्ये राहतात केवळ 200 लोक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(यूरोपमध्ये सर्वात उंच वसलेले आहे जॉर्जियाचे उशगुली गाव)
 
तिबलिसी- यूरोपमध्ये जॉर्जियाचे उशगुली गाव सर्वात उंच वसलेले आहे. हे गाव स्वॅनेटी रीजनमध्ये स्थित आहे. समुद्र किना-यापासून 7, 190 फुट उंचावर स्थित असलेले हे गाव आकर्षक आहे. या गावात ढग अगदी डोक्याला स्पर्श करतील असे आहेत. हिवाळ्यात या ठिकाणी जवळपास सहा महिने बर्फवृष्टी होते. 
 
सर्व हिरवेगार असलेल्या असलेल्या खडकावर वसलेल्या या गावाची लोकसंख्या 200 घरांची आहे. उशगुलीमध्ये एक शाळासुध्दा आहे. यूएनने या गावामध्ये बनलेल्या इमारतींना जगप्रसिध्द म्हणून घोषित केले आहे. उशगुली चार छोट्या गावांनी मिळून बनले आहे. त्यामध्ये जेहिबिआनी, चुबिआनी, चैजहाशी आणि मर्कुमेली ही गावे सामील आहेत. उशगुलीचे लोक एकत्र मिळून राहतात. 
 
सामान्य जनतेच्या मागणीवर स्वॅनेटी रीजनला रीझर्व घोषित करण्यात आले होते. येथील सौंदर्य अनोखे आहे आणि संपूर्ण परिसर एक लँडस्कॅपप्रमाणे आहे. सर्वात खास येथील टॉवर आणि चर्च आहेत. ते घाटाच्या उतारावर बनलेले आहेत. आसपासचे परिसर बर्फाने झाकलेला दिसतो. खडकांवर उतरलेले ढग येथील लोकांच्या आयुष्याचा एक भाग आहे. उशगुली गावाच्या या सौंदर्याला 30 वर्षीय फोटोग्राफर रफाल नेसेजने आपल्या कॅमे-यात कैद केले आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सर्वात उंच वसलेल्या या गावाची सुंदर छायाचित्रे...