तुम्ही इजिप्तमधील ममीजबाबत बरेच काही ऐकले किंवा वाचले असेल. ही हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, पापुआ न्यू गिनी नावाच्या एका लहानशा देशात आजही ममी तयार केले जातात. त्याठिकाणी अंगा ट्राइब्सचे लोक. नातेवाईकांच्या मृत्यूनंतर त्यांन आग आणि धुरामध्ये भाजून त्यांचे ममी तयार करतात.
भयावह आणि बीभत्स आहे ही प्रक्रिया...
- प्राचीन इजिप्तमध्ये डेड बॉडीची ममी तयार करण्यासाठी शरिरातील अवयव काढून, वर लेप लावला जात होता. त्यानंतर खास कापडामध्ये तो मृतदेह लपेटून ठेवला जात होता. पण पापुआ न्यू गिनीमधील प्रक्रिया अगदी वेगळी आहे.
- याठिकाणी डेड बॉडी आगीवर बसलेल्या अवस्थेत सुमारे तीन महिने टांगून ठेवली जाते. त्यादरम्यान सलग आग सुरू असते.
- या प्रक्रियेमध्ये डेड बॉडीवर लाकडाच्या सळायाही खोवलेल्या असतात. शरिरातील द्रव पदार्थ पूर्णपणे निघावे यासाठी तसे केलेले असते. त्यानंतर शरिरातील काही अवयवही काढले जातात. आग आणि धुरामध्ये शरीर भाजल्यानंतर त्याच्यावरील त्वचा काढली जाते.
कडक असतात नियम
- अंगा जमातीमध्ये ममी बनवण्याच्या प्रक्रियेसाठीचे नियम अत्यंत कडक असतात. तीन महिन्यांची ही प्रक्रिया मृताच्या कुटुंबातील पुरुष पूर्ण करतात. त्या संपूर्ण काळात ते त्याठिकाणीच राहतात.
- तीन महिने ते पाणी पित नाहीत. केवळ बांबूमधील ऊसाचा रस पितात. त्यांना काहीही खायचे असेल तर ते त्या मृतदेहाच्या खाली जळत असलेल्या आगीत शिजवूनच खावे लागले. तीन महिने अंघोळही करता येत नाही.
- मृतदेहाचे अवयव आणि शरिरातील द्रव पदार्थ काढताना काहीही खाली पडणार नाही याची काळजी घ्यावी लागते, अन्यथा ते अपशकुण समजले जाते.
- या संपूर्ण प्रक्रियेत चेहरा वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. आत्मा दिवसभर फिरल्यानंतर रात्री पुन्हा शरिरात प्रवेश करते, तेव्हा आत्मा चेहरा पाहूनच शरीर ओळखते असे हे लोक मानतात.
फोटोसाठी मिळत नव्हती परवानगी
- जर्मन फोटोग्राफर उल्ला लोहमेन 2003 पासून अंगा जमातीच्या लोकांमध्ये जातात. सुरुवातीला ते लोक त्यांना परत पाठवायचे. त्यांची परंपरा लोकांसमोर येऊ नये असे त्यांना वाटायचे.
- पण उल्लाने तेथे जाणे सोडले नाही. त्यावेळी एका महाताऱ्याने त्याला मृत्यूनंतर ममी बनायचे असल्याचे सांगितले. त्याची मुले त्यासाठी तयार नव्हती. पण त्यांना त्या म्हाताऱ्याचे ऐकावे लागेल.
- ही परंपरा पूर्वी प्रचलित होती. पण ब्रिटीश आणि ऑस्ट्रेलियाच्या सत्तेनंतर ते कमी झाले.
- 2015 मध्ये तो म्हातारा म्हणजे गेमतासूच्या मृत्यूनंतर त्याची ममी बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळी उल्ला तेथे होते. त्यांनी या सर्वाचे फोटो क्लिक केले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा. अंगा जमातीमध्ये कशी असते, ममी बनवण्याची प्रक्रिया...