आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीठापासून बनलेले हे हॉटेल एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाही, पाहा छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात अनेक प्रकारचे हॉटेल्स आहेत. प्रत्येकाचे एक वेगळेच वैशिष्टे आहेत. आतापर्यंत बर्फापासून निर्मित, पाण्यामधील आणि स्काय हॉटेल्सविषयी तुम्ही ऐकले असेल. मात्र मीठापासून बनलेल्या हॉटेलविषयी तुम्ही कधी ऐकले आहे का? बोलिव्हियामध्ये कोलछानीजवळ 'दि हॉटेल डी साल' ज्याला दक्षिण अमेरिकन हॉटेलसुध्दा म्हटले जाते.
The Palacio de Sal hotelमध्ये 30 रुम, एक डायनिंग टेबल आणि एक बार आहे. मीठापासून बनलेल्या या हॉटेलच्या भिंतीपासून ते बेडरुमपर्यंत सर्वकाही मीठाने बनलेले आहे. समुद्राकिना-यावर असल्याने हॉटेलचे सौंदर्य जास्तच निसर्गरम्य दिसते. फ्लोअरपासून ते टॉपपर्यंत, इंटीरिअर सोफा, बेड, खुर्ची-टेबल आणि इतर वस्तूसुध्दा मीठापासून बनलेल्या आहेत. निसर्गरम्य ठिकाणी भ्रमंती करायला येणारे पर्यटक 30 खोल्यांच्या या हॉटेलमध्ये काही दिवस घालवणे पसंत करतात.
एका रात्रीचे भाडे 9 हजारांपासून पुढे
हॉटेलमध्ये एका रात्र घालवण्यासाठी 9 हजारांपासून भाडे आहे. हिडाल्गोचे टूर गाईड पेड्रो पाब्लोच्या सांगण्यानुसार, 'जे पर्यटक पहिल्यांदा इथे येऊन या वातावरणाचा आनंद घेतात त्यांच्याकडे बघून खूप आनंद होतो.'
सर्वात मोठे क्षारयुक्त वाटळवंट
बोलिव्हियामध्ये कोलछानीजवळचा हा परिसर जगातील सर्वात जास्त क्षारयुक्त वाळवंटाचा प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ 10,580 किलोमीटर आहे. असे सांगितले जाते, की हे वाळवंट 40 हजार वर्षांपूर्वी मोठा तलाव होता. सध्या हे ठिकाण पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे केंद्र बनले आहे. असा अंदाज आहे, की 10 अब्ज टन मीठ या ठिकाणी उपलब्ध आहे. प्रत्येक वर्षी 25 हजार टन मीठ खोदून काढले जाते.
बोलिव्हियामध्ये मीठापासून बनलेल्या हॉटेलची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...