आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Story Of Zamzam Well Located Within The Masjid Al Haram In Mecca

ही आहे मक्काची धार्मिक विहीर, 1 सेकंदात देते 8,000 लीटर पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जमजम विहीरीचे पाणी आणण्यासाठी जमलेले आणि इन्सेटमध्ये विहीरीतून निघणारे पाणी)
मक्का- गुरुवारी (24 सप्टेंबर) मक्कामध्ये झालेल्या एका अपघातात 700पेक्षा जास्त लोकांनी प्राण गमावले. परंतु मक्का जगभरातील मुस्लिमांसाठी पवित्र ठिकाण आहे. येथे दरवर्षी विविध देशांतून लोक पोहोचतात. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, मक्काच्या एका धार्मिक विहीरीविषयी...
या विहीरीचे नाव 'द वेल ऑप जमजम' आहे. इस्लामिक मान्यतांनुसार, हे पवित्र स्थळ आहे. ही विहीर 4,000 वर्षे जूनी आहे. सांगितले जाते, की इब्राहिमचा मुलगा तहानलेला होता आणि पाण्यासाठी तडफडत होता. तेव्हा जमीनीतून पाणी काढण्यात आले होते. दरवर्षी हजसाठी येणारे लाखो लोक या विहीरीतून पाणी भरण्यासाठी येतात. साऊदी कायद्यानुसार, या विहीरीचे पाणी विकणे बेकायदेशीर आहे. तरीदेखील अनेक देशांत हे पाणी विकले जाते.
पूर्वी दोरीच्या सहाय्याने बादलीने या विहीरीतून पाणी काढले जाते होते. परंतु आता मोटर पंप लावले आहेत. यामधून 1 सेकंदात 8000 लीटर पाणी निघते. वॉटर पंपने पाणी मस्जिदच्या विविध परिसरात पोहोचवले जाते. येथून भक्त आरामात पाणी भरू शकतात. ही विहीर 30 मीटर खोल आहे आणि याची डायमीटर 1.08 ते 2.66 इतकी लांब आहे. हे पाणी खूप स्वच्छ मानले जाते आणि यामध्ये कोणताही रंग नाहीये किंवा सुगंध नाहीये. सायंटिफिक रिपोर्टनुसार, याचे पीएच 7.9 ते 8.0 इतके आहे. मात्र विहीरचे वैशिष्ट आहे, की हजारो वर्षे होऊनदेखील ती कधीच कोरडी पडली नाहीये. याच्या पाण्यात कोणत्याही प्रकारचे प्राणी, जीव-जंतू किंवा झाडे दिसत नाहीत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या विहीरीच्या पाण्याचा कसा होतो वापर...